आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️प्रतिनिधी- गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संघ
तळोदा (प्रतिनिधी) गेल्या दोन वर्षापासून कोविड-१९मुळे न भरून येणारे शैक्षणिक नुकसान झाले आहे. यासाठी आता अभ्यासाला लागून या स्पर्धेच्या युगात टिकून, यश संपादन करण्यासाठी भरपूर अभ्यास कराव लागेल. जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची तयारी ठेवावी. व्यसनापासून दूर राहावे.
आपणस आपल्या जीवनाचा शिल्पकार बनले पाहिजे.जीवनात यशस्वी होण्यासाठी थोर महापुरुषांची आत्मचरित्र वाचावी. नेहमी सकारात्मक राहावे. यावेळी बोलतांना डॉ.ए.पी.अब्दुल कलाम, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला या थोर महापुरुषांच्या जीवनातील काही प्रसंग, उदाहरणे दिली. अभ्यास कसा करावा व लक्षात कसं ठेवावे याविषयी ही काही ट्रिक दिल्या. ते आमलाड येथील विद्यार्थी अभ्यास संवाद कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी गुलाबसिंग वळवी, तुकाराम पावरा, अनमोल पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले. वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रावण वसावे यांनी आभार मानले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार