प्रहार शिक्षक संघटनेच्या प्रयत्नांना यश. बालाजी मुकनर यांना अखेर न्याय मिळाला

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Success-to-the-efforts-of-the-Prahar-Shikshak-Sanghtana


✍️गोपाल गावित सर, जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना 

गोपाल गावित सर






नंदुरबार दि. १९(प्रतिनिधी) नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी मेडिकल बिल फाईल प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड.सिमाताई वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपशिक्षणाधिकारी डॉ युनूस पठाण, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू मंत्रालय मुंबई यांना निवेदन देण्यात आले होते. 


Success-to-the-efforts-of-the-Prahar-Shikshak-Sanghtana


बालाजी पांडुरंग मुकनर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलवाडे ता.शहादा वैद्यकीय देयक कार्यरत २०१३-१४ ला धडगाव पंचायत समिती येथे कार्यरत असताना पुट-अप केलं होतं तेव्हापासून आजपर्यंत पाठपुरावा करत राहीले, पण मेडिकल बिल निघेल ही आशा मावळली होती. वास्तविक मी मेडिकल बिल हे वेळेत जमा केलं पण तत्कालीन लिपीक सुंदर्डे यांनी ती ओरिजनल फाईल गहाळ करून दिली. ती फाईल कुठे ठेवली गेली पंचायत समितीमध्ये सापडलीच नाही. 


Success-to-the-efforts-of-the-Prahar-Shikshak-Sanghtana


मधल्या काळात बालाजी मुकनर यांनी पत्रव्यवहार केला, त्यानंतर ती फाईल तीन वर्षांनी झिरो पेंडन्सी कामात श्री. कुलकर्णी नाना यांनी ती फाईल मला शोधून दिले मी स्वतः ताब्यात घेऊन पुन्हा त्या फाईलचे झेरॉक्स काढल पुन्हा हरवली तर काय करायचं आणि झालं तेच परत ओरिजिनल फाईल आवक-जावक ला पंचायत समिती धडगाव येथे पुट अप केल्यानंतर पुन्हा एकदा म्हणजेच दुसऱ्यांदा ती फाईल गहाळ अजून एका तत्कालीन क्लार्कने गहाळ करून टाकली आणि ती शेवटपर्यंत सापडलीच नाही तेवढं तरी बर की माझ्याकडे त्या फाईलचे पूर्ण झेरॉक्स होते. आता माझ्याकडे पर्याय उरला नव्हता पण मनाशी ठाम निश्चय केला. त्यावरच लढायचं पुन्हा फाईलचा प्रवास चालू ठेवला त्या फक्त आणि फक्त झेरॉक्स वर लढत होतो. जरी माझा प्रश्न खरा जरी असला तरी पण हे झेरॉक्स पाहून प्रत्येकांना असं वाटायचं कि सर्व काही खोट आहे. मी प्रयत्न करत राहील प्रत्येक प्रयत्नाची ओसी प्रत जवळ ठेवलं. धडगाव तालुक्यातून ओरिजिनल फाईल हरवल्याने झेरॉक्स फाईल कसे पाठवावे प्रश्न इथूनच सुरुवात झाला.


तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.युनुस पठाण यांनी पत्रक काढून ती फाईल जिल्हास्तरावर मागितले तेव्हा त्या झेरॉक्स फाईलाच अटेस्टेड करून जिल्हास्तरावर पाठवण्यात आले. पण म्हणतात ना की 'देर है पर अंधेर नही'. अस म्हटलं जातं की "सत्य परेशान होता है मगर पराजित नाही" अगदी या उक्तीप्रमाणेच मी कधीच हार मानलं नाही. माझे प्रयत्न सतत चालू ठेवल व बऱ्याच प्रयत्नानंतर ती झेरॉक्स फाईल सत्यप्रत करून जिल्हास्तरावर पाठवण्यात आले त्या फाईलला पुन्हा पुन्हा त्रुटी लावून ती फाईल पुन्हा पुन्हा तालुकास्तरावर परत यायची आणि मी परत पाठवायचं असे ३ वर्ष प्रयत्न चालले त्या कालावधी मी प्रत्येकाकडे प्रश्न मांडला पण काही जण ऐकून घ्यायचे तर काही जण ऐकून सोडून द्यायचे... 


शेवटी २०२१ मध्ये मी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित सर यांच्याकडे प्रश्न मांडला आणि त्यांनी तात्काळ हा प्रश्न आपल्या लेटरपॅडवर घेऊन त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे. अन्यायावर वार न्यायासाठी प्रहार. जेव्हा लेटरपॅडवर प्रश्न घेतले तेव्हा मनाला खूप समाधान वाटलं म्हणलं आता बिल नाही निघालं तरी चालेल पण आपला प्रश्न कोणीतरी वरिष्ठ पातळीवर मांडले याचं मनाला खरोखरच समाधान वाटलं. तर म्हणतात ना मनापासून प्रयत्न केले तर प्रयत्न वाया जात नाही तस या प्रदीर्घ प्रलंबित मेडिकल फाईलच्या ८ वर्ष प्रवासामध्ये शेवटी फाईल जिल्हा परिषद नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल गायकवाड, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, यांच्या स्वाक्षरीने मेडिकल फाईल मंजूरी मार्च २०२२ मध्ये फाईल अखेर मंजूर झाली. 


प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांना केलेले प्रयत्न खरोखरच अमूल्य आहेत. असेही मत बालाजी मुकनर यांनी संघटनेचे पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले आहे.



Post a Comment

0 Comments

झाले