कुडावळे येथील आदिवासी वाडीतील शाळा ही रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वोत्तम डिजिटल शाळा : गुंज फाऊंडेशन दिल्ली.

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


The-best-digital-school-in-Ratnagiri-district


प्रतिनिधी-गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संघ

दापोली: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडावळे भोईद - आदिवासी वाडी येथे गुंज फाऊंडेशन मार्फत विविध उपक्रम 26 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात आले. कार्यक्रमासाठी मुंबईहून अविनाश चौहान सर, हिमाचल प्रदेश मधून सोनम यांगझोम, केरळहून अतुल्या बेनी, रत्नागिरीतून विजय दुर्गावळे, विश्वास शिगवण, प्रथमेश नटूस्कर, मयूर नक्ति आणि कादिवली केंद्राच्या केंद्रप्रमुखा सौ. शीतल गिम्हवणेकर मॅडम तसेच आदिवासी वाडी, कलमकर वाडी व गावठाणातील ग्रामस्थ उपस्थित होते.

       

The-best-digital-school-in-Ratnagiri-district


आजपर्यंत भेट दिलेल्या शाळांमध्ये "कुडावळे येथील आदिवासी वाडीतील शाळा ही रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वोत्तम डिजिटल शाळा आहे" असे गौरवोद्गार टीमचे प्रमुख अविनाश चौहान सर यांनी काढले. गुंज फाऊंडेशनच्या सदस्यांमार्फत विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा व उपक्रम घेण्यात आले. सहभागी 27 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व स्कूल किटचे वाटप गुंज फाऊंडेशन मार्फत करण्यात आले. त्याचबरोबर गुंज फाऊंडेशन सदस्यांच्या उत्कृष्ट नियोजन व मार्गदर्शनामुळे एकाच दिवसात 15 मीटर लांबीचे 2 बंधारे देखील गावक-र्यांमार्फत नदीवर बांधण्यात आले. गावपातळीवरील पाण्याची समस्या देखील निश्चितच यामुळे सोडवली जाईल. सदर उपक्रमांमध्ये सहभागी सर्व कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले जाणार असल्याने गावकऱ्यांनी गुंज फाऊंडेशनचे आभार मानले.

      

The-best-digital-school-in-Ratnagiri-district


याप्रसंगी डिजिटल स्कूलच्या उर्वरित कामासाठी श्री. पांडुरंग चाळके, स्वप्नील गोरीवले, अनंत सापटे, प्रकाश माने, संतोष शिगवण, प्रवीण माने, नथुराम चाळके, सीताराम सापटे, राजाराम गोरीवले, लक्ष्मण बांद्रे सुरेश गोरीवले तसेच टांगर शाळेचे मुख्याध्यापक श्री. विवेकानंद कालेकर यांनी भरघोस आर्थिक मदत केली. सर्व देणगीदारांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

      

The-best-digital-school-in-Ratnagiri-district


कार्यक्रमस्थळी गावच्या सरपंच सरिता भुवड, सदस्य चंद्रभागा पवार, समिता गोरीवले, हरिश्चंद्र चांदे, अश्विनी राऊत तसेच अविनाश कुडाळकर, सतीश सावंत, संजय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भोईदवाडी अध्यक्ष विष्णू सापटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा विजया विजय जाधव, सर्व समिती सदस्य,  शिवाजी पवार, किशोर जाधव, सुष्मा गोरीवले, करिश्मा जाधव, विकास रहाटवळ, ग्रामस्थ व महिला मंडळ आदिवासी वाडी व भोईदवाडी यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री गजानन सामाले व आभार प्रदर्शन उपशिक्षक नितेश मोतेवार यांनी केले.


The-best-digital-school-in-Ratnagiri-district


कुडावळे जि. रत्नागिरी येथील आदिवासी वाडी शाळेतील मुलांनी केलेले सुंदर नृत्य






Post a Comment

0 Comments

झाले