✍️मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल मो-9307691872
यवतमाळ प्रतिनीधी:- बिरसा क्रांती दल व महिला फोरम तर्फे सुयोग मंगल कार्यालय यवतमाळ येथे जागतिक महिला दिन क्रांतिवीर सोमा डोमा आंध व क्रांती वीर बाबुराव शेडमाके यांची संयुक्त जयंती व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाची भूमिका विषद करतांना ते बोलत होते. इयत्ता चौथी ते बारावी पर्यंतच्या पाठ्यक्रमात आदिवासी च्या लढ्याला स्थान नाही. केवळ सातवीच्या पुस्तकात चाळीस शब्दांमध्ये राणी दुर्गावती चा उल्लेख केला आहे. आता बिरसा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या आदिवासी वस्तीवर जाऊन आदिवासी वीरांचा इतिहास सांगितले पाहिजे. तरच आमच्या तरुण युवकांचा आत्मसन्मान व स्वाभिमान उंचावेल व आपल्या लोकांमध्ये प्रेरणा निर्माण होईल. कारण जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास घडवू शकत नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. असे प्रतिपादन डी.बी. अंबुरे प्रदेशउपाध्यक्ष बिरसा क्रांतीदल यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बिरसा क्रांती दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी होते तर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून बिरसा क्रांती दलाचे राज्य अध्यक्ष रंगराव काळे महिला फोरमच्या अध्यक्षा गिरीजा उईके, माधुरीताई मडावी (नप मुख्याधिकारी यवतमाळ) डी.बी. अंबुरे, व्ही.डी.कोवे, किरण कुमरे, कैलास बोके, वसंत कनाके, नारायणराव पिलवंड, श्रीमती हरनाबाई पेजेवाड, श्रीमती जीजाबाई भोयर, शेखर मडावी, मारोती उईके, अर्जुन यूनाते, रमेश भिसनकर, तुकाराम जुमनाके, प्रकाश ढगे, रमेश मडावी, नागोराव गेडाम, शिवनारायण भोरकडे, रेखा पोयाम, शारदा वानोळे, सोनी जुनघरे, मिरा मडावी, शारदा वानोळे, अशोक ढोले, विमल फोले, काशिनाथ खरवडे, संतोष इंगळे, विलास दलसिंगारे, रोहीदास घोगेवाड, भिमराव खारोडे, अंबादास उमरे, संगिता पवार, हनुमंत पारधी व इतर आदिवासी बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या फोटोला पुष्पमाला अर्पण करण्यात आले, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. बिरसा क्रांती दलाचे प्रेरणा गीत सामूहिक रित्या घेण्यात आले. उपस्थित सर्व महिलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माधुरी माधुरी ताई मडावी हरणाबाई पेजे वाड, नारायणराव पिलवंड, चिरंजीव भोरकडे यांचा मानचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास बोके यांनी केले. कार्यक्रमाची भूमिका डी.बी अंबुरे यांनी मांडली.
यावेळी माधुरीताई मडावी यांनी महिलांनी अंधश्रद्धेपासून दूर राहा असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जीवन कोवे, अतुल कोवे, शुभम चांदेकर, शरद मडावी, अनंता पांडे, महिला फोरमच्या रेखा पोयाम, श्रीमती मडावी, मॅडम, व उपस्थित बिरसा क्रांती दल व महिला फोरमच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी यवतमाळ जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील बिरसा क्रांती दलाच्या महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार