आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल मो-9307691872
यवतमाळ:- आज आरक्षणामुळे विविध सरकारी नौकर्यामध्ये अदिवासी माणसं दिसत आहेत. ते केवळ आरक्षणामुळे. समजा ती शिकलेली असती पण आदीवासी जमातीची नसती तर त्यांना नौकरी मिळाली असती का? ही बाब आदिवासी कर्मचार्यांनी मनातुन समजुन घेण्याची गरज आहे. समाजातील ज्या लोकांना आरक्षणाचा लाभ झाला. त्याने इतर राहीलेल्या भावंडासाठी काम करण्याची गरज आहे. त्याचे होत असलेले शोषण, अन्याय या सर्व बाबींचा विचार करुन त्यातुन त्यांची मुक्तता करणे हे शिक्षित माणसांचे आद्य कर्तव्य आहे. आपल्या भाउबंधाचा विचार आपण करणार नसेल तर मग कोण करेल?.
सामाजीक बांधिलकीची जाण ठेऊन समाजातील संवेदनशील युवकांचे बिरसा क्रांती दल आणि कर्तव्य दक्ष कर्मचारी वर्गाचे बिरसा एम्पोलाईज फोरम व महिलांसाठी महिला फोरमची स्थापणा करण्यात आली आहे. सर्व आदिवासी बांधवानी या परिवर्तनाच्या लढ्यात सामील व्हावे असे आव्हाण या वेळी त्यांनी केले. ते उमरखेड येथे शेषरावजी इंगळे सेवानिवृत्ती सत्कार समारंभ या कार्यक्रमात बोलत होते.
कार्कक्रमाचे अध्यक्षस्थानी मधुकररावजी उईके साहेब होते.(केंद्रिय अध्यक्ष All India आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन,नागपूर) प्रमुख पाहूणे नारायनराव कर्हाळे, विश्वनाथ बुरकुले, पवनभाऊ आत्राम, गुलाबराव कुडमेथे, डी.बी.अंबुरे, भाऊराव जुडे, दत्तराव ब्रम्हटेके, नारायणराव पिलवंड, किशोर उईके, कुरकुटे, शुक्राजी रिठे, व्ही.व्ही.पोटे, हरि खोकले, समाधान वानोळे, सौ.विमल ठाकरे, शारदा वानोळे, यशोदा चवरे, आशा ढोले, सौ.खोकले ताई, शांतीदास खोकले, संजय अंभोरे, अनंता पांडे, प्रविण भुसारे, रविंद्र शेळके, गजानन भुसारे आदि उपस्थित होते.
यावेळी सत्कारमृती शेषरावजी इंगळे यांचा संघटनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डी.आर.उगले, एल.व्ही.भस्मे व सर्व एस.टी.कर्मचारी, बिरसा क्रांती दल, एम्प्लोईज फेडरेशन यांनी मेहनत व प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन चनेबोईनवाड केले. प्रास्ताविक डी.बी.अंबुरे यांनी केले.





0 Comments
जय आदिवासी
जय जोहार