आदिवासी महिलांनो अंधश्रद्धेपासून दूर राहा- माधुरीताई मडावी, मुख्याधिकारी न.प.यवतमाळ

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Tribal-women-stay-away-from-superstition


✍️मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल  मो-9307691872

यवतमाळ:- आदिवासी समाज दिवसेंदिवस आपली संस्कृती विसरत चालला आहे. नागरीकरनामुळे आदिवासी समाज इतरांची संस्कृती जगायला लागला आहे. समाजाचे शत्रु कोण? मित्र कोण? याची ओळख आपल्याला होणे गरजेचे आहे. समाजातील वाईट व चुकीच्या प्रथा, परंपरेचा, आम्ही त्याग केला पाहिजे. आपल्या मुला-मुलींना शिक्षणाचे महत्त्व सांगितले पाहीजे. जेवढा वेळ देव पूजनात घालता त्यापेक्षा जास्त वेळ मुलांचा अभ्यास घेण्यात घाला. त्यांच्यावर योग्य संस्कार करा. वैदिक धर्माचा त्याग करा. वैदिक प्रथा-परंपरा मोडीत काढा. तरच आपली प्रगती आणि विकास होईल. असे प्रतिपादन माधुरीताई मडावी यांनी केले.


बिरसा क्रांती दल, महिला फोरम तर्फे सुयोग मंगल कार्यालय, यवतमाळ येथे रविवार दि.१३ मार्च ला जागतिक महिला दिन, क्रांतिवीर सोमा डोमा, क्रांती वीर बाबुराव शेडमाके यांची संयुक्त जयंती व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष बिरसा क्रांती दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.दशरथ मडावी होते.

 

कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून बिरसा क्रांती दलाचे राज्य अध्यक्ष रंगराव काळे, महिला फोरमच्या अध्यक्षा गिरीजा उईके, माधुरीताई मडावी, मुख्याधिकारी न.प. यवतमाळ डी.बी. अंबुरे, व्ही.डी.कोवे, किरण कुमरे, कैलास बोके, वसंत कनाके, नारायणराव पिलवंड, श्रीमती हरनाबाई पेजेवाड, श्रीमती जीजाबाई भोयर, शेखर मडावी, मारोती उईके, अर्जुन यूवनाते, रमेश भिसनकर, तुकाराम जुमनाके, प्रकाश ढगे, रमेश मडावी, नागोराव गेडाम, शिवनारायण भोरकडे, रेखा पोयाम, शारदा वानोळे, सोनी जुनघरे, मिरा मडावी, अशोक ढोले, विमल फोले, काशिनाथ खरवडे, संतोष इंगळे, विलास दलसिंगारे, रोहीदास घोगेवाड, भिमराव खारोडे, अंबादास उमरे, संगित पवार, केशव बोरकर, हनुमंत पारधी, रामेश्वर ढगे, निलेश उकंडे, नामदेव पेंदोर, विजय काळे, योगेश मडावी उपस्थित होते.

   

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या फोटोला पुष्पमाला अर्पण करण्यात आली, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. बिरसा क्रांती दलाचे प्रेरणा गीत सामूहिकरित्या घेण्यात आले. उपस्थित सर्व महिलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माधुरीताई मडावी, हरणाबाई पेजेवाड, नारायणराव पिलवंड, चिरंजीव शिवांश भोरकडे यांचा मानचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास बोके यांनी केले. कार्यक्रमाची भूमिका  डी.बी अंबुरे यांनी मांडली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेजर जीवन कोवे, अतुल कोवे, अजाब कोडापे, शुभम चांदेकर, शरद मडावी, हेमंत मेश्राम, अनंता पांडे, महिला फोरमच्या रेखा पोयाम, डॉ.कविता भोयर, आशा वड्डे, मंगला कोडापे, वैशाली मडावी, आशा बोके, सोनु जुनघरे, या बिरसा क्रांती दल व महिला फोरमच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. 


या कार्यक्रमासाठी यवतमाळ जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील बिरसा क्रांती दलाच्या महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय मडावी, प्रणाली अगलधरे यांनी तर आभार अनिल पेंदोर यांनी मानले.



Post a Comment

0 Comments

झाले