आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️निवृत्ती भाऊ पवार ( एकलव्य संघटना जळगांव जिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा )
औरंगाबाद:- दिनांक १२/०३/२०२२ वार शनिवार रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील गोळेगांव येथे एकलव्य संघटना नाम फलकाचे अनावरण एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष मा.श्री. पवनराजे सोनवणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
तसेच मोटार सायकल रॅली काडून खुलताबाद तालुक्यातील गावांमध्ये जनजागृती करण्यात आली व गोळेगांव येथे संघटनेच्या वतीने आदिवासी समाज प्रबोधन मेळावाचेही आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रदेश अध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब व आलेले प्रमुख अतिथी यांनी आदिवासी भिल समाजाला सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, व समाजावर वेळवेळी होणाऱ्या अन्याय अत्याचार या विषयावर समाजात जनजागृती करून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सोबत मा.रमेशजी शिंदे साहेब (मराठवाडा अध्यक्ष), मा.सुनिल ठाकरे साहेब (जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद), मा.परशुराम सोनवणे साहेब (जिल्हा सचिव औ.), मा.आत्माराम सोनवणे साहेब (जिल्हा उपाध्यक्ष औ.), मा.देविदास ठाकरे साहेब (जिल्हा सहसंघटक औ.), मा.गणेश पवार साहेब ( वाळुज शहर प्रमुख), मा.आत्माराम सोनवणे (सोयगाव ता.अध्यक्ष), मा.राजु वाघ साहेब (ता.अध्यक्ष खुलताबाद), मा.सुरेश गायकवाड साहेब (ग्रामीण ता.अध्यक्ष खुलताबाद), मा.अतुल सोनवणे साहेब (युवा ता.अध्यक्ष खुलताबाद), मा.बापु सोनवणे साहेब (वि.सं.ता.अध्यक्ष सोयगाव), मा.मारोती पवार साहेब (ता.सचिव कन्नड), मा.सुनिता मोरे (महिला आघाडी ता.अध्यक्ष कन्नड ) तसेच इतर पदाधिकारी व आदिवासी भिल समाज बांधव व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार