आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
अमोल पवार मालेगाव उपजिल्हा प्रतिनिधी
सटाणा (बागलाण) : महाशिवरात्री दिनी सर्वत्र वीर एकलव्य जयंती साजरी केली जाते. यावर्षी बागलाण तालुक्यातही ठिकठिकाणी एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ; मात्र चर्चेचा विषय राहीला तो म्हणजे अजमेर सौंदाणे येथिल वीर एकलव्य पुतळ्याच्या अनावरणाचा.
बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे गावात वीर एकलव्य पुतळ्याचे अनावरणास अनेक अडथळे आले असताना येथिल कार्यकर्त्यांसमोर मोठा पेचप्रसंग उभा ठाकला होता. गावातील काही लोकांनी पोलीसांकडे खबर दिल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या, गुन्हे नोंद करण्यासंबंधी तंबी देण्यात आली होती. अनेक बड्या नेत्यांना पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आमंत्रीत करण्यात आले होते मात्र त्यांच्यापुढेही पोलीस कारवाईचा पेच उभा होता, ही बाब आदिवासी मित्र अमोल बच्छाव सर नाशिक जिल्हा प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी यांना कळली असता त्यांनी पुतळा स्थापनेच्या ठिकाणी धाव घेऊन प्रश्न मार्गी लावला.
महाभारतातील पात्र 'कृष्ण' आणि रामायणातील पात्र 'राम' असताना, जर कृष्ण आणि राम यांच्या मुर्ती उभारण्याला, उपासना करण्याला कायद्याचा अडथळा नाही, तर मग एकलव्याच्या मुर्ती अणावरणाला आणि उपासनेला विरोध का ?'
हा विधायक आणि कायदेशीर प्रश्न जाहीरपणे व्यवस्थेसमोर उभा करत आदिवासी मित्र प्रा. अमोल बच्छाव सर यांनी अजमेर सौंदाणे येथिल वीर एकलव्याच्या पुतळ्याचे अनावरण केले.
कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे तालुका संघटक निलेश देवरे यांनी वीर एकलव्यांच्या पात्राविषयी माहीती दिली व बिरसा फायटर्स तालुका उपाध्यक्ष सचिन सोनवणे यांनी आभार व्यक्त केले
| अमोल बछाव सर समवेत दादाजी बागुल सर व आदिवासी समाज बांधव |
या प्रसंगी कृष्णा पवार, गुलाब माळी, भगवान माळी, विजय सोनवणे, अशोक सोनवणे, रमेश पवार, संजय धोंडगे, खंडू सोनवणे, पिंटू खेरणार, शिवाजी पवार,नानाजी खैरणार, नारायण माळी, राहुल माळी ,अर्जुन माळी बाळा पवार ,सुरेश गायकवाड, बापू पावर, शरद सरदार, भावडू दादा, भावसा सोनवणे, ग्यानदेव माळी, अनिल माळी, ललित पवार, बबन पवार, सचिन अहिरे, अमोल लोणारे, दीपक माळी, पांडुरंग सोनवणे, किशोर माळी, राहुल माळी, नयन धोंडगे, विशाल धोंडगे, समाधान सोनवणे, कृष्णा बर्डे, दयाराम वाघ, दीपक गायकवाड, दीपक खेरनार, रमण माळी, करण पिपळशे, राजू पिपळशे, सुरेश माळी, युवराज पवार.व बिरसा फायटर्सचे दादाजी बागुल सर, हिरालाल गायकवाड, राजु जाधव, भाऊसाहेब माळी, संपूर्ण दुधमाळ वस्ती, लहुजी शक्ती सेनेचे सर्व कार्यकर्ते, एकलव्य प्रतिष्ठानाचे कार्यकर्ते, गायक अनिकेत भवरे व सर्व टिम त्याबरोबरच ब्राम्हणगांव येथील आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार