आमदार डॉ. संदीपभाऊ धुर्वे यांचे यवतमाळ नगरीत आगमन होताच आदिवासी समाजाकडून जल्लोषात स्वागत.

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Welcome-to-MLA-Dr.-Sandip-Dhurve-from-Adivasi-Samaj.


 यवतमाळ:- आदिवासींकरीता १२ हजार ५०० पदांची रखडलेली विशेष पदभरती मोहीम पुन्हा सुरु करण्याची घोषणा सरकारने १० मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेच्या सभागृहात केल्यानंतर या भरतीसाठी जीवाचे रान करीत  पोटतिडकीने, सातत्याने २०२० पासून सभागृहात तमाम आदिवासी समाजाचा आवाज बुलंद करणारे लोकप्रिय आमदार डॉ. संदीपभाऊ धुर्वे यांचे आज सकाळी ७.३० वाजता यवतमाळ नगरीत आगमन झाले. 


Welcome-to-MLA-Dr.-Sandip-Dhurve-from-Adivasi-Samaj.


आगमन होताच आदिवासी समाजातील विविध संघटनाकडून आमदार डॉ. संदीपभाऊ धुर्वे यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. आमदार महोदयांनी बसस्थानक नजिक संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर आर्णी नाक्यावर जाऊन क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले.  


Welcome-to-MLA-Dr.-Sandip-Dhurve-from-Adivasi-Samaj.


यावेळी ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्याध्यक्ष मिनाक्षीताई वट्टी, ट्रायबल फोरमचे जिल्हाध्यक्ष प्रफुल कोवे, जिल्हा संघटक संतोष किन्हाके, दिलीप मडावी, ट्रायबल युथ फोरमचे बळी आत्राम, अँड.विलास टेकाम, नयन पेंदोर, गोपाल केराम, प्रज्वल मेश्राम, अविनाश केराम, प्रकाश आत्राम, दिनेश आत्राम, रामेश्वर पेंदाम, विकास कोवे. ट्रायबल आँफिसर फोरमचे एन.झेड.कुमरे, एस.झेड कुमरे. आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे केंद्रीय कार्याध्यक्ष सुरेश कन्नाके, गुलाबराव कुडमते, पवनकुमार आत्राम, डॉ. हरीष धुर्वे, मंतूभाऊ कुडमते, विजय पेंदाम, शंकर कोटनाके, अभिमन्यू धुर्वे, विजय गेडाम, पुरुषोत्तम मडावी, राजु मडावी, सेवानिवृत्त मसराम साहेब कोया पुनेम गोटूल समितीचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सिडाम, लक्ष्मण कुळसंगे, माजी जि.प.सदस्य मिलींद भाऊ धुर्वे. गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या निकीता ऊईके, गोंडवाना संग्राम परिषदेचे बाळू वरठी यांचेसह विविध आदिवासी संघटनामधील शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments

झाले