जागतिक महिला दिन व विर बाबुराव शेडमाके जयंती संयुक्तिकरित्या साजरी होणार

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Women's-Day-and-Veer-Baburao-Shedmake-Jayanti-will-be-celebrated-jointly


✍️मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल मो-9307691872

यवतमाळ ( प्रतिनिधी ) ८ मार्च जागतिक महीला दिन व १२ मार्च ला आदिवासी क्रांतीविर बाबुराव शेडमाके यांची जयंती संयुक्तिकरित्या साजरी करण्याचा निर्णय बिरसा क्रांती दल, महिला फोरमच्या विद्यमाने दि.१३ मार्च रविवार ला यवतमाळ येथे सुयोग मंगल कार्यालय आर्णी नाकायवतमाळ येथे होणार आहे.  


Women's-Day-and-Veer-Baburao-Shedmake-Jayanti-will-be-celebrated-jointly


मा.दशरथ मडावी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांचे अध्यक्षतेखाली मिटींगचे आयोजन दिनांक ५ मार्च २०२२ रोज शनिवार ला विश्रामगृह यवतमाळ येथे  करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती बिरसा क्रांती दलाचे राज्य अध्यक्ष मा.रंगराव काळे, बिरसा क्रांती दल महिला फोरमच्या राज्य अध्यक्षा मा. गिरिजा उईके,  राज्य उपाध्यक्ष डी.बी.अंबुरे उपस्थित होते.


Women's-Day-and-Veer-Baburao-Shedmake-Jayanti-will-be-celebrated-jointly


या बैठकीचे आयोजन बिरसा क्रांती दल व महिला फोरम च्या वतीने करण्यात आले. या वेळी बिरसा क्रांती दलाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून रमेश भिसनकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच माजी जिल्हा अध्यक्ष प्रा.कैलास  बोके यांची विदर्भ स्तरावर सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली. या वेळी आशा वडे, मंगला कोडापे डॉ.कविता भोयर, यांची यवतमाळ तालुका बिरसा  क्रांती दल, महिला फोरम मध्ये निवड करण्यात आली. तसेच दारव्हा तालुका महीला फोरम अध्यक्ष म्हणून प्रणाली अगलदरे यांची तर आर्णी तालुका महिला फोरम अध्यक्ष या पदावर हिराताई धुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली. 


या वेळी बिरसा क्रांती दलाचे राज्य  संघटक प्रा.वसंत कनाके, तुकाराम जुमनाके, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पेंदोर, जिल्हा महासचिव संजय मडावी, नागोराव गेडाम, शरद चांदेकर, नारायणराव पिलवंड, रमेश मडावी, यवतमाळ तालुका अध्यक्ष मेजर जीवन कोवे, संगित पवार, रामेश्वर ढगे, निलेश उकंडे, शुभम चांदेकर, भुजंगराव कुळसंगे, अजाबराव मारेकर, किशोर कुळसंगे, महादेव सिडाम, महिला फोरमच्या रेखा पोयाम, सोनूताई जुनघरे उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments

झाले