जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दलेलपूर ता. तळोदा जि.नंदूरबार येथे जागतिक महिला दिन साजरा

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Z.P.-Primary-School-Dalelpur-Celebration-of-Women's-Day-at-Taloda


✍️राजु प्रधान BTTS अध्यक्ष तळोदा

नंदुरबार दि.८ ( प्रतिनिधी ) दिनांक 08/03/2022 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दलेलपूर ता. तळोदा जि.नंदूरबार येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रम अध्यक्षा श्रीमती रेखाताई पाडवी व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री राजू प्रधान व सदस्य श्री संतोष मराठे, व मंचावरील मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत शाळेच्या विद्यार्थीनीनी स्वागत गीताने केले. यावेळी शाळेत नियमित 100% उपस्थित व शालेय कार्यक्रमात नेहमी सहभागी असणाऱ्या विद्यार्थीनींचा सन्मान करण्यात आला. तसेच शाळेतील महिला शिक्षिका ,गावातील तिन्ही अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच महिला स्वयंपाकीताई चा कोराना काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचा शालेय व्यवस्थापन समिती कडून प्रशस्तिपत्र देऊन उचित सन्मान करण्यात आला. 


तसेच जनार्थ सेवा गृप दलेलपूर ता तळोदा तर्फे जागतिक महिला दिना निमित्ताने आधार गमावलेल्या महिलांना मदत म्हणून साडी वाटप करण्यात आल्या.


शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना सोहनी मॅडम यांनी जागतिक महिला दिनाचा उद्देश व महिला दिनाची पार्श्वभूमी, महत्त्व, स्त्री शिक्षण या विषयी सखोल मार्गदर्शन केले. शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री संतोष मराठे तसेच मराठे सर यांनी महिला दिनानिमित्त सर्व महिला भगिनींना शुभेच्छा देऊन महिला दिनाचे महत्त्व विशद केले तसेच मराठे सरांनी महिला दिनी कर्तुत्ववान महिलांचा परिचय करुन दिला. 


आजच्या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे सर्व कार्यक्रमाचे नियोजन व संचालन शाळेतील महिला भगिनींनी केले, प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीमती ऋतिका वाघ मॅडम यांनी केले. उपस्थितांचे आभार श्रीमती शालिनी शिंदे मॅडम यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . 

 

Post a Comment

0 Comments

झाले