पिंपळगांव/माडगी येथे अंगणवाडी केंद्रावर पल्स पोलिओ मोहिम

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




एस के जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ राष्ट्रीय विश्वगामी राज्य पत्रकार संघ सदस्य 

भंडारा ( १ मार्च ):- पिंपळगाव/माडगी येथे दिली २७ रोजी अंगणवाडी केंद्रावर धारगांव जि.प. व गुथारा क्षेत्राच्या पंचायत सदस्या कांचन होमदास वरठे यांनी ० ते ०५ वयोगटातील २५ बालक-बालिकांना पल्स पोलिओ पाजले. यावेळी रजनी वरखडे व भोवते मॅडम अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. 


यावेळी काचन वरठेजींनी 'पल्स पोलिओ डोज संबंधी सर्व उपाय कसे करावे. वैश्विक महामारी व कोरोणा सारख्या रोगावर प्रतिबंध उपाय करण्यात कोणतीही कसर करू नये असे सुचविले. 


माता ह्या सर्व परी बालकांचे आरोग्यसंबंधी  व संकटाची चाहूल लागताच सुरक्षेची जबाबदारी घेणाऱ्या प्रथम  पालणहार व त्या प्रथमश्रेणी ग्राम अभियाणाच्या डाॅक्टर असतात.


तसेच रोगराईवर मात करण्यासाठी सरकार युध्द पातळीवर कार्य करीत आहे. जीवनोपयोगी अभियान व स्पर्धाचे कार्य आरोग्य मय मोहिमांचा सुभारंभ म्हणजे सुदृढ भारताची सुरवात असेल असे उपस्थीत महिलांना सांगितले.

Post a Comment

0 Comments

झाले