निरोप समारंभ येणाऱ्या यशस्वी पिढीचा, येणाऱ्या यशस्वी पाखरांचा.!

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




✍️मद्रास पावरा शिरपूर तालुका प्रतिनिधी

शिरपुर (तालुका प्रतिनीधी) शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, कोडीद येथील १० वी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. ह्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित सरपंच भरत पावरा व डॉ हिरा पावरा उपस्थिती यांनी दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे भाग्य प्राप्त झाले.




यावेळी TTSF चे सामाजिक व विद्यार्थ्यांसाठी योगदान सांगितले.आदिवासी आयडॉल श्री.डॉ.राजेंद्र भारुड सर व श्री.अजय खर्डे साहेब ह्यांचे आदर्श ठेऊन, ध्येय निश्चित ठेवून यश प्राप्तीसाठी पुढे जावे अशी अपेक्षा आपल्या संभाषणातून व्यक्त केली. अतिशय भावनिक अशा वातावरणात हा समारंभ आयोजित झाला.




 याप्रसंगी सर्व मान्यवर, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी व सर्व शालेय कर्मचारी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments

झाले