आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️प्रतिनिधी- गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संघ
आपण समाज म्हणून कुठे चाललोय आणि येणारी पिढी समाजाला कस बघते हे चिंतन करायची हीच वेळ आहे,
✒️डॉ.विजय पवार (अंबापुर, शहादा)
शहादा:- अलीराजपुर, वालपुर म.प्र मध्ये जे काही घडलं ते भयावह आहे, समाजाच्या प्रत्येक स्तरातून ह्याचा निषेध नोंदवला गेला पाहीजेय, जे अलिराजपुर वालपुरला घडलं ते कुठल्याही भोगऱ्या हाट बाजारात होऊ शकत, किंवा ही आजच्या भोंगऱ्या बाजारांची वास्तुस्तीती असेलही, ही घटना कॅमेरात कैद झाली, वायरल झाली म्हणून ती समोर आली, रात्रभर चालणाऱ्या ह्या बाजारात उन्माद माचवणारे असे मनचले फिरत असतात त्यांना रोखणार कोण आहे, तटपुंजी पोलीस यंत्रणा कोणाकोणाकडे लक्ष देईल, गावातील युवक इतके भरकटलेत की त्यांना आवर घालणं कठीण होऊन बसलंय.!
हा उन्माद, ही गुर्मी, ही हिम्मत, ही घृणा कुठून निर्माण होतेय ह्याचा शोध घ्यावा तो समाजानेच, मुळात समाजाची भीती कुणाला राहिली नाही, कुण्या वरिष्ठ वृद्ध माणसाचा धाक राहिला नाही, समाज इतका लाचार कसा झाला? की ही अशी समाजाला काळीक फासणारी घटना घडतेय.!!
आजवर आदिवासी समाजात कित्येक मेवादे, भोंगऱ्या बाजार पाहिले पण अशे कृत्य कुठेच पाहिले नाही, अगदी मुलमुली एकत्र नाचून सण साजरा करतांना ही असे दृष्ट घडलेले पाहिले नाही, हजारोच्या संख्येने येणारी युवा पिढी भोंगर्या साजरा करतांना पाहिली पण ती मर्यादा लाज आजवर टिकून होतील, आपल्या गावच्या मुलीची कुणी छेड जरी काढली तरी आखा एक युवा वर्ग समोर उभा ठेकायचा, आणि मुळात अशी हिम्मत कुणी करत नव्हतंच, मग समाजात ही लाचारी आली कुठून.
व्यसनांनी पिळून काढलेल्या समाजात, आजून किती वैचारिक लाचारी येणार आहे, कधी आपण कृत्यातून सम्पन्न होऊ हाच मोठा प्रश्न.!
मागच्या २ वर्षांपासून शाळा बंद आहेत, तरुण पिढी भरकटत चालली आहे, मागे एका उत्तरकार्यात एक वृद्ध पण रोखठोक खमकर असे पोलिस पाटील भेटले, त्यांच्याबरोबर गप्पा मारतांना त्यांनी सांगितलेले प्रसंग आज आठवले, ते म्हटले डॉक्टर जेव्हा पासून शाळा कॉलेज बंध झालेत गावात तरुण पोरांनी जिणं मुश्किल केलय, दारु, सिगरेट, गुटखा काही म्हणू नका सर्व व्यसन लागून गेलीत, चांगली हुशार पोरही त्यातून सुटली नाहीत, ऑनलाइन च्या नावाने मोबाइल घेऊन सर्विकडे खबर पोहचते इथे पार्टी आहे, लग्न आहे, उत्तरकार्य आहे बस मग चार-चार सीट मोटरसायकल वर बसून चालले हिंडायला, सर्वानी मिळून पेट्रोल भरायचं आणि जायचं फिरायला, गावात नुसता वैताग आणलाय, पोरींना बाहेर निघायची मुभा नाही येता-जाता टोळकी करून बसतात, पत्ते गुटखा आणि संध्याकाळ झाली की दारू, दारू बंदी असलेल्या गावात सर्वात जास्त दारुडे आहेत, तरुण पोरांची लग्न मोडायचे प्रमाणही हल्ली वाढत चाललीत ते काय डेव्हिल वगैरे सांगतात तशे ग्रुप बनवून फिरतात रोज कुठे ना कुठे झगडा तंटा मिटवायला जावं लागतंय, आता तर लाज शरम सोडून खुल्यात सिगारेटी ओढतात, सिनेमातल्या हिरो सारखी स्टाईल मारतात, बोलायला गेलो की अंगावर धावून येतात (हे बोल एक पोलिस पाटलाचे आहेत लक्षात घ्या)
इतक्या टोळ्या झाल्यात की विचारू नका, त्यात राजकीय पक्षाच्या टोळ्या वेगळ्या, प्रसंगी पैसे कमी पडले की पुढारी आहेतच पुरवायला, राशन फुकट भेटायला लागल्यापासून कामधंदे सोडले आणि हेच करत फिरताय.
मागे कुणी आमचे जयस मध्यप्रदेश चे कार्यकर्ते म्हणत होते की समाजाने ह्या भोंगऱ्या बाजारात जाण बंध करावं, पैसा वाया जातोय समाजाचा आणि अपरिहार्य घटना घडताय त्यात समाजाची छवी खराब होतेय ती वेगळी हे अगदी खरंच मानावे लागतय सध्या तरी..!!!
खरच आपण समाज म्हणून हा विचार करायला हवा, परंपरेच्या सणाच्या नावाखाली जे काही घडतंय ते दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे..!!!!!
भयाण शोकांतिका.!
✒️डॉ.विजय पवार (अंबापुर, शहादा)

2 Comments
अगदी सत्य बोललात डॉ. आपण...अत्यंत लाजास्पद गोष्ट आहे, निलर्ज म्हणावं कि बुद्धीभ्रश्त् युवा तेच कळेना...कोणत्या अश्या आनंद साजरा करायचा सण साजरा करायच्या ठिकाणी लोक अश्लील विचार सरणी घेऊन जात आहेत....हिच मोठी शोकांतिका..इतर समाजापुढे...आपण ठेवलेली.आपली चित्र....आहेत ही....
ReplyDeleteआता तरी बदल घड़वायला पाहिजे लोकांनी
Deleteजय आदिवासी
जय जोहार