पर्यावरणस्नेही होळी निमित्ताने लाखनी बसस्थानकावर राबविले स्वच्छता अभियान व वृक्षपूजनानंतर केले केरकचरा होळीचे केले प्रतिकात्मक ज्वलन

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)





 एसके जी.पंधरे वि.ब्युरो चिफ, महाराष्ट्र राज्य सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार

लाखनी:- येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी तर्फे मागील 17 वर्षांपासून सातत्याने दरवर्षी पर्यावरणस्नेही होळी व रंगपंचमी साजरी करत असून यावर्षी सुद्धा पर्यावरणस्नेही होळी निमित्ताने 'रंग माझा निसर्गाचा' उपक्रम आणि बसस्थानकावर स्वच्छता अभियान लाखनी नगरपंचायतच्या सहकार्याने प्रमुख अतिथीच्या हस्ते राबविण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त कलाशिक्षक दिनकर कालेजवार तर प्रमुख अतिथी म्हणून लाखनी नगरपंचायतचे नगरसेवक संदिप भांडारकर, ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे व मंगल खांडेकर,ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य, पदाधिकारी दिलीप भैसारे, योगेश वंजारी हे उपस्थित होते.या कार्यक्रमाला नेफडो जिल्हा भंडारा व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा यांचे सुद्धा सहकार्य लाभले.

   

यावेळी प्रास्ताविकपर मार्गदर्शन करताना लाखनी नगरपंचायत स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबेसेडर व ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह  प्रा.अशोक गायधने यांनी लाकडाची होळी करण्यामुळे होणारी पर्यावरण हानी सोदाहरण पटवून दिले तसेच रासायनिक रंगाचे दुष्परिणाम समजावून दिले.सर्व प्रमुख अतिथीनी यथोचीत मार्गदर्शन यावेळी करून ग्रीनफ्रेंड्सच्या सातत्यपूर्ण 17 वर्षाच्या विविध कार्यांची प्रशंसा केली.यानंतर  ग्रीनफ्रेंड्स व नगरपंचायत  लाखनी स्वच्छता अभियान तर्फे लाखनी बसस्थानकावरील 'नेचर पार्क' मध्ये राणी लक्ष्मीबाई विद्यालय लाखनी व सिद्धार्थ विद्यालय सावरीच्या हरित सेनेच्या विद्यार्थ्यांच्या साहाय्याने स्वच्छता अभियान  राबवुन गोळा केलेला कचरा एकत्र जमा करण्यात आला. त्यानंतर प्रमुख अतिथींनी वृक्षपूजन करून सांकेतिक केरकचरा होळी प्रतिकात्मक स्वरूपात पेटविण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी 'नका पेटवू लाकडाची होळी -करा रे होळी केरकचरा व व्यसनांची' असा उदघोष केला.यावेळी ज्येष्ठ नागरिक दिनकर कालेजवार व मारोतराव कावळे यांच्या वाढदिवसानिमित्त शाल व श्रीफळ व वृक्षभेट  नगरसेवक संदीप भांडारकर यांच्या हस्ते देण्यात येऊन सत्कार करण्यात आला .नुकतेच निवडून आलेले नगरसेवक संदीप भांडारकर यांचा सुद्धा सत्कार शाल व श्रीफळ देऊन अशोक वैद्य व दिनकर कालेजवार  यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण नेचरपार्क मध्ये करण्यात आले.

   

 'खेळा होळी  इकोफ्रेंडली- पर्यावरणस्नेही' उपक्रमाअंतर्गत 'रंग माझा निसर्गाचा' ही  नैसर्गिक रंग बनवा स्पर्धा ग्रीनफ्रेंड्स व नगरपंचायत लाखनी स्वच्छता अभियान तर्फे घेण्यात आली.यात विद्यार्थ्यांनी आकर्षक असे नैसर्गिक कोरडे व ओले रंग तयार करून आणले.सिद्धार्थ विद्यालय सावरी मधून  प्रथम क्रमांक खुशी भुरे, अनुष्का धारगावे यांना,द्वितीय क्रमांक गुंजन बांगळकर,रोहित कुंभरे,भाविका पचारे,दिव्या सानसरोदे यांना तर तृतीय क्रमांक  खुशी राऊत,मनीषा पचारे,सेजेल निर्वाण,अंशिका मोटघरे यांना प्राप्त झाला.राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय लाखनी येथून गायत्री वैद्य, गेवेश्री निखाडे ,अमोली बडवाईक यांना प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक मनस्वी गभने,सृष्टी व चैतन्य वंजारी,चारू वैद्य, ईशान वैद्य यांना तर तृतीय क्रमांक मयंक वंजारी,वेदांती वंजारी दिक्षा बावनकुळे, पायल चचाने यांना प्राप्त झाला.नैसर्गिक रंग बनवा स्पर्धांचे निरीक्षण  राष्ट्रीय हरित सेना प्रभारी निधी खेडीकर व दिलीप भैसारे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लाखनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके व बांधकाम अभियंता राधेश्याम इंगोले याचबरोबर साकोली बस आगार प्रमुख गौतम शेंडे,बसस्थानक नियंत्रक भास्कर डहाके व राणी लक्ष्मी कन्या विद्यालय लाखनीचे प्रभारी हरितसेना शिक्षिका निधी खेडीकर व सिध्दार्थ विद्यालय सावरीचे प्रभारी हरितसेना शिक्षक दिलीप भैसारे यांनी  तसेच सहभागी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments

झाले