कटकवार विद्यालयात 'खेळा होळी- इको फ्रेंडली' कार्यक्रम, विद्यार्थ्यांनी तयार केले आकर्षक नैसर्गिक रंग

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Play-Holi-Eco-Friendly


स्वच्छता अभियान राबवून केली केरकचऱ्याची होळी


एसके जी.पंधरे विदर्भ ब्युरो चिफ

महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ (भारत सरकार मान्य)

साकोली:- कृष्णमूरारी  कटकवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाअंतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबतर्फे खेळा होळी इको फ्रेंडली कार्यक्रम मागील 13 वर्षाप्रमाणें यावर्षी सुद्धा प्राचार्य रामकृष्ण हारगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.


यावेळी ग्लोबल नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने तसेच शिक्षक विठ्ठल सुकारे यांनी पर्यावरणस्नेही होळी  कशी साजरी करावी यावर समयोचित मार्गदर्शन केले. प्राचार्य रामकृष्ण हारगुडे यांनी शालेय परिसरासोबत गावामध्ये सुद्धा स्वच्छता अभियान राबवून केरकचरा होळी करावी तसेच नैसर्गिक रंगाचा वापर करावे असे आवाहन केले. निसर्गमित्र युवराज बोबडे, सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबवून जमा केलेल्या केरकचऱ्याच्या होळी प्राचार्य हारगुडे सराच्या हस्ते वृक्षपूजन केल्यानंतर प्रज्वलन करण्यात आले.

  

नैसर्गिक कोरडे व ओले रंग बनवा स्पर्धेत प्रथम क्रमांक पूर्वा बहेकार व संचिता करंजेकर ला द्वितीय क्रमांक निधी बनकर, ऐश्वर्या संग्रामे, आकांशा वाघमारे ला प्राप्त झाला तर तृतीय क्रमांक सायली क्षिरसागर, योगिनी रणदिवे, नीरा रणदिवे, चेतना वाघमारे यांना प्राप्त झाला. 


स्वच्छता अभियानात निसर्गमित्र युवराज बोबडे, सुरेंद्र राऊत, पूर्वा बहेकार,योगिनी रणदिवे, सायली क्षिरसागर, संचिता करंजेकर, आकांशा वाघमारे, यामिनी कापगते, निधी बनकर, ऐश्वर्या संग्रामे, शौर्य बैस, नीरज रोकडे, श्रावण येवले यांनी श्रमदानात सहभाग नोंदविला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद, प्राध्यापकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

झाले