आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ
प्रतिनिधी-गणेश खर्डे मलगाव उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख
अहमदनगर:- मान नेतृत्वाच्या सन्मान कर्तृत्ववाचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर करण्यात आले तर गावातील युवा सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपरगणेचे मा श्री चिंतामण चंदर वडेकर मु पिपरगणे ता आंबेगाव जि पुणे यांना आज रोजी 20 मार्च वार रविवार पुणे नाशिक हायवे हिरवगार पावसा टोलप्लाझा जवळ संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे पारनेर विधानसभाचे लोकप्रिय आमदार मा.श्री निलेश लंके साहेब व आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
तसेच संघाचे वतीने मनोगत व्यक्त करण्यात आले की, आपल्या गावात ग्रामपंचायत च्या माध्यमातून विविध योजनांच्या सहाय्याने सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकास कामे करून तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नाव लौकिक मिळविला आपल्या या कार्याचा गौरव व्हावा म्हणून सरपंच सेवा संघाच्या वतीने आपणास आदर्श सरपंच पुरस्काराने आपणास सन्मानित करण्यात येत आहे.
आपण आपल्या पुढील काळातही असे सामजिक कामे करण्यासाठी ईश्वर शक्ती देवो. आपल्या पुढील भावी कार्यास सरपंच सेवा संघाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा..!देण्यात आले. व मान नेतृत्वाच्या सन्मान कर्तृत्ववाचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा संपन्न झाला

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार