गडचिरोली येथे गोंडवन गोंड महासभा च्या वतीने जयपाल मुंडा यांचा स्मृती दिन साजरा

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)





प्रबोधनपर कार्यक्रम गोंडवन पेटल आहे प्रबोधनकार -राहुल पेंढारकर 


एसके जी पंधरे-विदर्भ ब्युरो चिफ सहसंघटक महाराष्ट्र राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ भारत सरकार मान्य


गडचिरोली (२१मार्च) नुकतेच जिल्हा गोंडवन सभा / आदिवासी स्वायत परिषदेच्या वतीने संविधान निर्माता, उच्च शिक्षित, विभुषित, आई सीएस परिक्षा उतीर्ण होणारे पहिले आदिवासी परीक्षार्थी, हाॅकी खेळाचे सुवर्ण पदक विजेता, राष्ट्रीय चैम्पियन, पेसा कायद्याचे जनक व जल वन जंगलाचे अभ्यासक, परम पुज्य  जयपालसिंग मुंडा साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त आदिवासी प्रबोधनपर गोंडवाना पेटल आहे चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात  आयोजित करण्यात आला. 




याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहुल पेंढारकर युवाध्यक्ष विदर्भ बिरसा फायटर्स समाज प्रबोधनात्मक मंचकावर आपले विचार व मतप्रदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष पेंदामजी मिल्ट्री मॅन, गोंडवाणा पक्ष महाराष्ट्र अध्यक्ष हरिशजी उईकेजी आणि अनेक जेष्ठ श्रेष्ठ आदिवासी विचारवंत गोंडवाणा फायटर्स उपस्थित होते.




याप्रसंगी योगायोगाने आ. प्रबोधनमंच चंद्रपुरच्या वतीने गीत गायन संगीत रजनी सोहळा पार पडला यावेळी आदिवासी बांधव महिला पुरूष, विद्यार्थी हजर होते सभागृह पुर्ण भरलेले होते श्रोतागण ऐकण्यात तल्लीन झालेले होते.

Post a Comment

0 Comments

झाले