आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️मद्रास पावरा शिरपूर तालुका प्रतिनिधी
शिरपूर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळाणाऱ्या घरकूलची रक्कम तीन लाख पन्नास हजार रू. वाढवून मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्सचे नाशिक विभाग अध्यक्ष विलास पावरा यांनी अपर आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या महागाईमुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भीडले आहेत. दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचे भाव सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. मात्र दुसरीकडे गरीबांना हक्काच्या घरात राहता यावे याकरिता भारत सरकार कडून प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात आलेली आहे. या उदात्त हेतूने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनाचा शासनाकडून मिळणारा निधी अत्यंत कमी आहे. मात्र एकीकडे सिमेंट, वाळू, विटा, डबर, मजूरी, लोखंड इत्यादींचे यांचे भाव प्रचंड वाढलेले आहेत.
वाढत्या महागाईमूळे सदर लाभार्थी आपल घर बांधू शकत नाही. त्यामुळे सरकार कडून प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत मिळणाऱ्या घरकूलची रक्कम तीन लाख पन्नास हजार रुपये पर्यंत वाढवून मिळावी. जेणेकरून गरीब लाभार्थी आपलं हक्काचं घर बांधू शकेल.


.jpeg)
0 Comments
जय आदिवासी
जय जोहार