आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
गोंडवाना विदर्भचे बिरसा फायटर्स युवा उपाध्यक्ष प्रशांत पंधरे यांनी नागपूर विभाग आरोग्य संचालक व पोलिस महानिरीक्षक यांना कार्यवाहीसाठी पत्र दिले
✍️एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ (भारत सरकार मान्य)
नागपूर प्रतिनिधी: वरिल विषयाच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते कि, तुमसर तालुक्यातील गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. २२ मार्च २०२२ रोजी कर्तव्यावर असलेले परिचर श्री.नारायण उईके (वय ५४) या आरोग्य कर्मचाऱ्याला तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर कडसकर यांनी परिचराला जवळ बोलावून "तु ड्युटी बरोबर करीत नाही" असे सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हातातील काठीने व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करुन, गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सदर प्रकरणी परिचर श्री. नारायण उईके यांच्या तक्रारीवरुन आरोपी डॉ. सागर कडसकर यांच्यावर ॲट्रोसिटी नुसार गोबरवाही पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका प्रतिष्ठित एम.बी.बी.एस. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने आपल्याच आरोग्य केंद्रातील परिचराला मारहाण करणे अशोभनीय कृत्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
करीता दोषी वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर कडसकर यांचेवर कडक कार्यवाही करण्याची मागणी जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी व आदिवासी संघटनेकडून होत आहे.
मा. महोदय, सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, माणुसकीला काळीमा फासत, एका सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायाविरुध्द वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर कडसकर यांचेवर दंडात्मक व कडक कायदेशीर कार्यवाही होऊन, गोंड समुदायातील परिचर श्री. नारायण उईके यांना न्याय मिळणेबाबत संघटने तर्फ कडकडीची मागणी करण्यात येत आहे.
उपस्थित युवा उपाध्यक्ष, बिरसा फायटर्स संघटना (गोंडवाना विदर्भ शाखा), नागपूर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी ह्युमन राईट्स संघ (भारत). अध्यक्ष, जय गोंडवाना बहु व क्रिडा मंडळ, नागपूर .


0 Comments
जय आदिवासी
जय जोहार