आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
विश्व महिला दिनी आशा गट प्रवर्तक पुरस्कार मनिषा सुरेश पंधरेंना विनय मून CEO भंडारा यांचे हस्ते
✍️एसके जी पंधरे- विदर्भ ब्युरो चिफ रा. वि.पत्रकार संघ भारत
साकोली (११ मार्च) नुकतेच विश्व महिला दिनी आरोग्य संदर्भ सेवेचा पुरस्कार सोहळा भंडारा येथे संपन्न झाले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत व जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग भंडाराच्या अनुसंघाने मनिषा सुरेशकुमार पंधरे खांबा पी एचसी २०२०-२१ चा जिल्हा स्तरिय सर्वोत्कॄष्ठ पुरस्कार १००००/- रू. प्रमाणपत्र व स्मृर्ती चिन्ह CEO विनय मून यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी सकाळी आशांचे नृत्य गीत व कविताचे कथन व वाचन झाले यावेळी CEO व आरोग्य विभागाचे अध्यक्ष सचिव यांचे भाषणे झाली. यामुळे संकट काळी गोरगरिबांना अंत्योदयपर्यंत सेवा देणार्या घटक म्हणून आशांना विविध सर्वे करून घेत सरकार कोविड 19 महामारीवर विजय मिळविण्यास यशस्वी होत आहे याचे श्रेय आशा व आरोग्य विभागास जातो.
यामुळे जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनात सर्व जिल्हा अग्रेसर सतर्क असतो. वेळोवेळी अन्य व्याधीवर प्रतिबंध करण्यास सरकार सफल होत असतो बक्षिस व पारोतोषिक मेळाव्याचे आयोजणात वक्त्यांनी विविध विषयावर मार्गदर्शनपर मेळाव्यात प्रबोधन केले.
यावेळी सर्वच तालुकास्तर साकोली तुमसर, मोहाडी, पवनी, लाखांदुर लाखनी व सातही तालुका निहाय महिला आशा व गटप्रवर्तक हजर होत्या.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार