आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
गृहमंत्री मुख्यमंञी यांना अन्यायाप्रसंगी गोंडवाणा पक्ष पदाधिकाऱ्यासोबत फोनवर चर्चा -सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स
पिडीत बालिकेस न्याय मिळावा संघटणाची पत्र परिषदेत डि.एम यांना निवेदनातून न्यायाची मागणी व आंदोलणाचा इशारा
एसके जी.पंधरे वि.ब्युरो चिफ, महाराष्ट्र राज्य सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार
यवतमाळ प्रतिनीधी (१६मार्च):- ७ वर्षीय बालिकेवर दुष्कर्म बलात्कार करणाऱ्या संजय मोहन जाधव नराधमास कठोर शिक्षा व्हावी म्हणून गोंडवाणा गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप शेडमाके व पदाधिकाऱ्यांनी पत्र परिषदेत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन दिले.
यावेळी मा.विवेक उईके तह दारव्हा उपाध्यक्ष, तारा कोटनाके जि. उपाध्यक्ष, सुरज खोब्रागडे संभाजी ब्रिगेड ता.मनोहर खडके ता अध्यक्ष, दिलीप पी शेडमाके, वि सभा अध्यक्ष, विक्रम मडावी उपाध्यक्ष, यवतमाळ, वाघेश कोकांडे, दिलीप तोडासे, संघटक जिल्हा साहिल पठाण, संघटक, अजय फुफरे व इतर गोंडवाना गणतंत्र पक्ष संभाजी ब्रिगेड, बिरसा फायटर्स व पदाधिकारी हजर होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी असे अन्याय थांबविण्यासाठी पोलीस क्राईम प्रशासनाने असे अमानुष कृत्य करणाऱ्या नराधमाविरोधात ॲक्शन घ्यावी व ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.
तरी सदर निरागस बालिकेस आर्थिक मदत करावी व पीडीतेला चांगले उपचार व्हावेत यासाठी दवाखाण्यात दाखल करावे व न्याय देण्यात यावा. अन्यथा सामूहिकपणे बिरसा अनुयायी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा गंभीर ईशारा सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने इशारा देण्यात आला.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार