आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
नागझिरा वनसंरक्षण व्याघ्रक्षेत्रा लगत शंभुगौरा प्रगटदिनी भक्तांगण व श्रध्दाळुंनी बेलफुलांनी उडवला भजनांचा बार ----
पर्यटन विकासाबाबत पक्षीतज्ञांच्या जिवनावर चर्चा व तिर्थस्थळास निधी उपलब्ध करण्याचे ट्रष्टी व आयोजकांची मदतीची हाक
एसके जी.पंधरे-विदर्भ ब्युरो चिफ राष्ट्रीय विश्व.पञकार राज्य संघ.
साकोली/वलमाझरी(२मार्च):- महाशिवरात्री महोत्सव दि.२८ ते २ मार्च दरम्यान संपुर्ण भारतवर्षात व पुरोगामी महाराष्ट्रात आदिपुरूष शंभु गैरा यांचे स्नेह मिलनपर्वावर व प्रगट दिनी महापुजा व भजन मॄदंगाच्या तालात भक्त भष्म कपाळी लावून व नाचून रंगात न्हाऊन जातात.
या दिनाचे महत्व, जनजागृती व्हावी याच हेतूला साध्य करण्यासाठी भोळ्या शंभुगैराचे गुणगान पाच दिवस चालले आहे. सामाजिक, धार्मिक कार्याचे औचित्य साधून मा.नंदुभाऊ समरित, मा.मनिष कापगते नगरसेवक साकोली, पी. जी. रुखमोडे तडफदार सरपंच वलमाझरी /खैरी, शंकर कापगते, पोपा.दिपलता समरित जिल्हा प सदस्य, सरिता लंजे प स सदस्या, शोभा कंगाले, सदस्या ग्राप, यांचे प्रमुख उपस्थितीत काला व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी वरिष्ठ व जेष्ठ नागरिक, सरपंच यांच्या वतीने नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्या दिपलता समरित व सरिता लंजे पं.स. सदस्या यांचे ट्रष्ट, वलमाझरी, खैरी, आमगांव, पिटेझरी (गटग्राम पंचायत) यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारोह संपन्न करण्यात आला.
या पिंडकेपार क्षेत्रात नव्हेतर विविध गावांचे विकास कामे करण्यासाठी शंभु मादवास बल व आरोग्यमय पुजाविधी करून प्राथना केली. यावेळी नंदुभाऊ समरित मित्र परिवार व सभोवताली चाहता वर्ग या तिर्थ स्थळी महिला, पुरूष, गावकरी व भक्तांगण श्रध्दाळु उपस्थित होते.
या निसर्गरम्य व सुंदर पहाडीच्या विकासासाठी (वलमाझरी - खैरी ) ग्रामस्थ मेहनत घेत आहेत. भविष्यात या क्षेञात अनेक युवा युवतींना रोजगाराच्या विविधसंधी उपलब्ध व्हावे म्हणुन या राष्ट्रीय नविन नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्प (NNTR) अनेक वर्षापासून पक्षीतज्ञ, माधवराव पा.डोंगरवार (नवेगांवबांध) मारूती चित्तमपली असे लोक या क्षेञाशी संबंधीत आहेत. पुणे व मुंबई शहर व इतर राज्यातून पर्यटक येथे येवून राहून वास्तव्यात आहेत. (निसर्ग लेखक सुरेशकुमार पंधरे ) पुणेरी मिञ- निसर्गमिञ व पक्षीतज्ञ किरन पुरंदरे ( किका ) हे पिटेझरी ग्रामिण खेडुतांसोबत जंगलव्याप्त आदिवासींच्या सहजीवनावर संशोधन करीत आहेत. त्यांच्या सुखदुखात व(घर) बांधून अतिशय आनंदीत राहत आहे. पक्षी,वन्यजीव प्राणी,यांचे जीवंत चिञातून हालचाली कँमेराबध्द करीत आहे. पर्यावरणातील गतीविधीचे व निसर्गाचे रोजचेच लेखन टिपण आपल्या रोजनिशीत नोंदवित आहेत. आपल्या पदपावनाने नागझिर्यात भार्या अनघा पुरंदरे सह समाज सेवेतून ग्रामवासी व पर्यटका़ंसाठी ते एक दांपत्य निसर्गातील चालते बोलते प्रशिक्षण केंद्रच आहेत.
ह्या संरक्षित क्षेञाची वॄक्षतोड रोखण्याचे सरकारी कार्याने प्रेरित होवून काम करित आहेत अशा अनेक ह्या वेळी मान्यवराच्या गप्पाष्टक रंगल्या... यावेळी भजन व विविध महादेव व गैराचे भजनाने अख्खा आसमंत दुमदुमला होता. व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार