आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️निवृत्ती भाऊ पवार ( एकलव्य संघटना जळगांव जिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा )
जळगांव (जिल्हा प्रतिनिधी):- दिनांक : 01/03/2022 वार मंगळवार रोजी महाशिवरात्री तसेच सर्व श्रेष्ठ धनुर्धारी महादंड नायक भगवान एकलव्य यांची जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.
भगवान एकलव्य जयंतीचे औचित्य साधून एकलव्य संघटना प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री.सुधाकरराव वाघ साहेब, जळगांव लोकसभा जिल्हाध्यक्ष मा.श्री.संजुबाबा सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष जळगांव श्री.रविभाऊ सोनवणे, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष मा.श्री.निवृत्तीभाऊ पवार यांनी जळगांव जिल्ह्यातील पारोळा, एरंडोल, पाचोरा, भडगांव तालुक्यातील, बहुटे, चाबूत्रे, उत्राण, भातखंडे, अंतुर्ली, तारखेडा गोरडखेडा एकलव्य जयंती निमित्त भेट देऊन प्रतिमा पूजन करण्यात केले.
तसेच काही गावांमध्ये एकलव्य संघटनेच्या वतीने समाज बांधवांना रेशनकार्ड वाटप करण्यात आले ह्यावेळी सोबत एकलव्य संघटना एरंडोल तालुका उपाध्यक्ष श्री. जयभाऊ मोरे, पाचोरा तालुकाध्यक्ष श्री. गणेशभाऊ वाघ, भडगांव तालुकाध्यक्ष श्री. दशरथभाऊ मोरे, पारोळा तालुकाध्यक्ष श्री.गणेशभाऊ गायकवाड, जळगांव तालुकाध्यक्ष श्री.मंगलभाऊ सोनवणे, जळगांव महानगराध्यक्ष श्री.राहूनभाऊ ठाकरे, एरंडोल तालुका उपाध्यक्ष श्री.राहुलभाऊ सोनवणे व श्री.गणेशभाऊ मोरे, श्री.भिवसन बाबा सोनवणे, श्री.संजयभाऊ मोरे व भिल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महादंडनायक भगवान एकलव्य जयंती फोटो Mahadandanayak-Bhagwan-Eklavya-Jayanti-Photo

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार