चांदसैली येथील क्रिकेट सामन्यात बोरपाणी संघ ठरला उपविजेता सह घेतले दोन ट्राफि

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




✍️प्रतिनिधी- गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष                                                                                  उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संघ

नंदुरबार:- दि.05/03/2022 रोजी चांदसैली ता.शहादा येथे सलग एक महिन्यापासून सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यात आर्यन क्लब बोरपाणी हिने पटकवला दुसरा बक्षिस बक्षिसे स्वरूप अकरा हजार व ट्राफि त्याच बरोबर उत्कृष्ट फलंदाज म्हणून संघाचे कर्णदार किरण पावरा तर उत्कृष्ट फिल्डिंग म्हणून संघाचेच खेळाडू सुभाष पावरा यांना ट्राफि नंदुरबार जिल्हाध्यक्ष सीमाताई वळवी, शहादा पंचायत समितीचे उपसभापती रोहिणी ताई पवार, लंगडी चे सामाजिक युवा कार्यकर्ते निलेश भाऊ सुळे वडगांव चे सरपंच लगन दादा पावरा व सर्व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली 




असे तीन ट्राफि व अकरा हजार रुपये आर्यन क्लब बोरपाणी च्या संघाने मिळवले सदर क्रिकेट सामन्यात एकूण 64 संघ सहभागी झाले होते त्यात बोरपाणी संघाने उपविजेता बक्षिस मिळवुन गावाचे नाव लौकिक केले किरण पावरा, मदन पावरा, कैलास पावरा, चिंगालाल पावरा, आकाश भिल, राकेश भिल, सुभाष पावरा, सुभाष पावरा, धनराज पावरा, रजाक पावरा, सखाराम पावरा या खेळाडूंनी आपला खेळ दाखवून गावाचे नाव लौकिक केले या बद्दल युवा नेते आबासाहेब राहुल रंधे, प्रा.दशरथ पावरा, गाव पाटील रामदास पावरा, लाड्या पुजारा, देवसिंग डायल, जाड्या पावरा व ग्रामस्थांनी सर्व्यांचे कौतुक केले.


Post a Comment

0 Comments

झाले