मोखे येथे महिला उमेद व माविम गटाच्या अनोखी तालुका कबड्डी स्पर्धा संपन्न

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




एसकेजी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 

साकोली:(४मार्च) उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत पहिली वार्षिक सभा ‌व स्नेह संम्मेलन अधिवेशनाचे उदघाटक दिपलता समरित सदस्या जि. प. भंडारा तर अध्यक्ष- वंदना कांबळे स्नेहदिप संघ, शीतल राऊत जि.प. सदस्या, वि.अतिथी सुरेशकुमार पंधरे राष्ट्रपती पुरस्कृत, समन्वयक सरपंच परिषद मुंबई, सरिता लंजे सदस्या प.स सुशिलजी गणवीर, पंचायत समिती सदस्य किन्ही, अर्चना ईळपाते, पं.सदस्य विर्शी, केमेश्वरी टेंभरे सर्वश्री सरपंच, शालु इळपाते उकारा, भिमावती पटले जांभळी,

माधुरी कटरे खांबा, विशेष अतिथी केडी टेंभरे, ईअोपी, साकोली उमेश नंदागवळी, अश्विनकुमार बंसोड, निलेश वानखेडे, सहा.गट वि अधि केडी.फरकुंडे ता.व्यवस्थापक  स्नेहा गौ.खाडे, प्रभाग समन्वयक, पिंडकेपार यावेळी प्रमुख वक्ते व  उदघाटक अध्यक्ष यांचे भाषणे झाले.


बक्षिस वितरण सोहळा अध्यक्ष म्हणुन "पंधरेंनी महिलांना आद्य नारीशक्ती संबोधून प्रसिध्द हनुमाण व रावनाची आपण माता व जगजेत्या विरांच्या जन्मदात्री माता आहात असे संबोधले. कोरोणात संदर्भसेवा देत आपण सतर्क आहात तर जग आहे, हे दाखवून दिले कुणाला घराबाहेर जाऊ दिले नाही. कोरोणामध्ये मृत्यु पावलेल्या डाक्टर्स, नर्स, आशा वर्कर, सरपंच यांचे मोठ्या प्रमाणात मृत्यु झाले त्याबाबत मृतकांना श्रध्दाजंली वाहिली. 


बक्षिस कबड्डीच्या अंतिम विजेत्या संघास सुरेशकुमार पंधरेनी स्वंय कडून आदिवासी संघटना बिरसा मुंडा  लोगो असलेली बनियानी वस्तू रूपात भेट दिली. बक्षिस वितरण करण्यात आले. 


यावेळी अंतिम विजेत्या संघाला गोंडवाणा प्लेअर्स प्रदेशाध्यक्षा "तर्फे विविध नृत्य गटास पुरस्कार व प्रतिसाद देण्यात आला. सकाळ पाळीत महिला गटांची विविध उपक्रम राबवून रांगोळी, परिक्षण पाहुण्याचे हस्ते दिपप्रज्वलन, नारीशक्ती शिक्षिका विद्येची देवता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व बहूजन प्रतिपालक प्रथम गुरू शिवराय, माता जिजाऊ शहीदवीरांच्या प्रति चिञांना हलदी कुंकू लावले प्रमुख अतिथींचे सुध्दा कुंकुमतिलक लावून तत्पुर्वी गेटवर स्वागत व अभिवादन व नंतर शहिंदाच्या प्रतिकृतींना माल्यार्पण करण्यात आले. 


उमेद टिम कडून स्वागत गीतांनी ताल व सप्तसुरांचे अभिजित मिलनानी संगीताच्या सुमधुर आवाजात पाहुण्यांची बॅचेस लावून मानवंदना करण्यात आले. दुसऱ्या सञात सांस्कृतिक कार्यक्रमात उज्वल ग्रामसंघ खांबा तर्फे अभिवादन गीत, राजू राऊत सचिव मोखे यांनी शेवटी विविध महिला गटांना प्रशस्तिपत्रक भेट वस्तूने संम्मानित करण्यात आले.


स्नेहदिपचे प्रास्ताविक के.डी फरकुंडे, आभार स्नेहाजी गौतम खाडे, संचालन शिल्पा बावनथळे यांनी केले.





Post a Comment

0 Comments

झाले