आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल मो-9307691872
पुणे जिल्हा:- अनुसूचित जमातीच्या (ST) संशोधक विध्यार्थ्यांना संशोधन फेलोशिप मिळणे बाबत आंदोलनास बसलेल्या आदिवासी संशोधक कृती समिती (नियोजित) विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी आज दि ३१ मार्च रोजी बिरसा क्रांती दल संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा पत्र व डॉ राजेंद्र भारुड आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, अनुसूचित जमातीच्या संशोधक पीएचडी पोस्ट डॉक्टरेट) विद्यार्थ्यांना संशोधनाकरिता राज्य शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या आदिवासी विभागातर्फे कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य व संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही. राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय आदिवासी मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय अनुसूचित जमाती फेलोशिप (NFST) मिळते पण काही किचकट अटी मुळे महाराष्ट्रातील नगण्य अनुसूचित जमाती संशोधक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळतो व त्याचे प्रमाणही नगण्य आहे. ज्या या संशोधक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती फेलोशिप चा लाभ मिळत नाही. त्यांना बऱ्याच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते आणि बऱ्याचदा काही विद्यार्थी संशोधन प्रकल्प अर्ध्यावर सोडून देतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (BARTI) ची स्थापना 1969 मध्ये झाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 1913 साली न्यूयार्क येथे उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठाचा ऐतिहासिक प्रवास केला होता. या स्मृतिप्रित्यर्थ बार्टीने 2013 मध्ये अनुसूचित जातीच्या विध्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिप (BANRF) सुरु केली. त्यांनतर छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे (SARTHI) याची स्थापना २०१३ साली झाली. त्यांनी मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी प्रवर्गातील उच्च शिक्षण घेऊन इच्छिणाऱ्या गुणवत्ताधारक पीएच.डी करणाऱ्या उमेदवारांसाठी सारथी मार्फत छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन फेलोशिप (CSMNRF-२०१९) सुरू केली. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (MAHJYOTI) स्थापना २०१९ मध्ये झाली असली तरी MAHAJYOTI ने इतर मागासवर्गीय (OBCs), विमुक्त-जाती, भटक्या-जमाती व विशेष मागास प्रवर्गातील (SBCs), संशोधक विध्यार्थ्यांना MJFRF २०२० संशोधन फेलोशिप सुरू केली आहे.
वरील दोन संशोधन संस्था या पुणेस्थित आहेत आणि महाज्योती ही संस्था नागपूर येथे स्थित आहे. TRTI ही संशोधन संस्था देखील पुण्यातच आहे. इतकेच नसून TRTI ही सगळ्या संस्थे पेक्षा सर्वात जुनी तसेच भारतीय संविधानकृत आणि स्वायत्त संस्था आहे. वरील संस्था त्या त्या सामाजिक प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस प्रोत्साहन देण्यासाठी पूर्ण आर्थिक सहाय्य करतात. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने सुद्धा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना संशोधक अधिछत्रवृत्तीस प्रोत्साहन द्यावे, त्यास्तव राज्यातील अनुसूचित जमातीच्या संशोधकांसाठी (PH.D./POST DOCTORATE TRIBAL RESEARCH FELLOWSHIP) फेलोशिप सुरू करावी जेणेकरून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून दर्जेदार संशोधन होऊन आदिवासी समुदायाच्या विकासास योगदान मिळेल. भारत सरकारच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) कायद्याच्या कलम २(f) आणि १२(b) अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठे संस्था महाविद्यालयांमधून नियमित आणि पूर्णवेळ एम.फील., पीएच.डी आणि पोस्ट डॉक्टरेट मध्ये संशोधन करणारे महाराष्ट्रातील आदिवासी असलेले अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ही संशोधन फेलोशिप द्यावी तसेच सदरील फेलोशिप मूळ आणि खऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळण्यास जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करावे. तसेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथील ग्रंथालयाचा संशोधक विध्यार्थ्यांना उपयोग करता यावा याची परवानगी द्यावी ही विनंती.
सदरील निवेदनाचा विचार करून आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांचा फेलोशिप हा मुद्दा/प्रश्न आपण शासन स्तरावर मांडून मार्गी लावावा. ही नम्र विनंती.
यावेळी बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा. हरिभाऊ तळपे, बिरसा क्रांती दल राज्य सचिव आदि. चिंधू आढळ, आंबेगाव ता. अध्यक्ष मा .सुरेश वाळकोळी, कोषाध्यक्ष मा .संदीप भवारी इत्यादी पदाधिकारी व आंदोलनातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


.jpeg)
0 Comments
जय आदिवासी
जय जोहार