सरपंच परिषदेचे दमदार पाऊल गावचे प्रश्न मांडले सरकार दारी

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




एसके जी.पंधरे विदर्भ ब्युरो चिफ, सहसंघटक रा विश्व पञकार संघ.

साकोली / भंडारा  (१६मार्च) नुकतेच सरपंच परिषद मुंबई व महाराष्ट्रातील तमाम हितेषी सरपंच मिळून समाजसेवीमंच ग्रामपंचायत मधून घरकुल ते अनेक विकासकामे करीत आहे राज्यात सामाजिक अार्थिक सर्वेशनाचा डाटा सन २०११ साला अनुसंघाने "ब" यादीचे घरकुल संपत आहेत व आता "ड" ला प्रतिक्षित यादी जाहीर केली असली तरी त्यात शासन दरबारी अर्ज मागविण्यात आले व सुरवात झाली. 




पण अजूनही गरजवंत व गरीबांची मातीचे घर असलेल्यांचे नावे सुटल्याचे निदर्शनात येत आहेत म्हणुन सरपंच परिषद मुंबईच्या वतीने अतिदक्षता पाळून अनेक जिल्हास्तर जिल्हा समन्वयक यांचे सुचनांचे आदर करित त्यांचे प्रश्न अळी अळचणीं वर मात करण्यासाठी दि.१४ मार्च रोजी महा राज्य ग्रामविकास मंञी नामदार हसन मुश्रीफांच्या दालणा त अनेक विषयांती चर्चत विकास कामे करण्याचे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी महा राज्य  प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, अँडव्होकेट विकास जाधव, सर- चिटनिस, बाळासाहेब धुमाळ, जि.जळगा‍ंव प्रभारी, जामनेरचे सरपंच राजमल भागवत,सरपंच परिषदेचे मुख्य शिलेदार श्रीकांत पाटील, बाळूभाई चव्हान, नंद कुमार डोईफोडे, आदिजन अगत्याने हजर होते. 


यावेळी घरकुल यादीतून वगळलेले नावे पुन्हा समाविष्ठ करने,तसा ठराव ग्रामपंचायतीकडुन घ्यावे. पाणी पुरवठा योजनेची बिले भरण्या करिता ग्रामपंचायतींना वेगळा अनुदान उपलब्ध करून देने, "सरपंच" ना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रमुख विकासाचे कर्णधार म्हणुन  सरपंच,उपसरपंच यांना बरोबरी चा मतदानाचा हक्क व अधिकार असावा, पोर्टलवर खर्च करण्या बाबत येणार्या अळचणीवर मंञी महोदय हसन मुश्रीफ यांचेशी चर्चा घडवून आनली. विशेष म्हणजे सरपंच परिषद संघटनेचे पाईक गावाचे कैवारी म्हणून सातत्याने धडपड करून विकास कामे रेटून धरित आहे.


Post a Comment

0 Comments

झाले