आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
महिला शक्तीला जागृत करण्याचे उमेदचे विश्व महिला दिनी राज्यात भंडारा शहर गजबजले.
भंडारा जिल्हा महिला उमेद महिलांनी रॅलीत राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, विरागंना राणी लक्ष्मीबाई, विरागंना राणी दुर्गावती मडावी यांच्या वेषभुषा परिधान केली...
पिंडकेपार पं स साकोली उमेदने वेषभुषा व गोंडी नॄत्यासह अनेक विषयावर भाषने केली..
एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ राष्ट्रीय विश्व.पञकार संघ भारत
भंडारा-(९मार्च) भंडारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून उमेद महिलांचे झुंड, त्यातून रॅली, प्रदर्शन व नारी शक्तीची ताकद काय आहे असा वारसा असलेला सांस्कृतिक भव्य सोहळा पाहायला मिळाला ञिमुर्ती चौक ते भंडारा शहरातील अनेक मुख्य मार्गावर माविमगट विविध सामाजिक संस्थानी मिळून "बेटी बचाव, बेटी पढाव", "नारी शक्तीचा विजय असो" अशा जयघोषाने शहर दुमदुमला.
राजमाता जिजाऊ, हातात तलवार, राणी दुर्गावती मडावी, आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, यांचे मुखवटे वापरून महिला दिन अखिल भारतीय सभागृह गणेशपुर येथे संपन्न झाले.
यावेळी सामुहिक नृत्य व नाटिका सादर केल्या त्यात साकोली तालुक्यातील पिंडकेपार महिला प्रभाग संघ त्यांचे प्रतिनिधी समन्वयक स्नेहा खाडे, देवला कापगते, चुळा टेंभरे, मिनाक्षी घरत, प्रिया दड्डेमल, माधुरी टेंभरे, केशर नारनवरे, शीतल घरत, मजुषा घरत, वंदना कापगते, मनिषा सुरेशकुमार पंधरे, कोकिला मेश्राम, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, गटाचे अध्यक्ष सचिव उपस्थित होते.
सदर जिल्हा रॅलीतील उमेदचा देखावा महिला व शहरवासीयासाठी विविध झाड, फूल, वृक्षानी सजलेल्या व बहराला आलेलेल्या जशा बागा दिसाव्यात असे विहंगम दृश्य दिसत होते. त्यातून नारी शक्तीची ताकद व उम्मेद दिसत होती. जसे आज या रॅलीतील महिला समुहाचे झुंड कोरोणाला चिरत कार्यक्रम स्थळावर पोहचत होते. शहीद महिलांचे फोटो चिञात दिसावेत तसाच मंगलमय देखावा तितका म्हणावा तेवढा थोडाच! याचा गर्व महिलांना त्याच्या चेहर्यावर कुणी पाहिला नसेल ते ओसंडून वाहणारे हास्य सांगत होते.
नारीशक्तीचा संचार आणि स्रीयांच्या हाती तलवार असल्यावर संकटातील वादळ व वारा ही समत (थंड) असतो हेच सांगावेसे वाटते.
अंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सरपंच परिषद मुंबई-भंडारा, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व बिरसा फायटर्स, विदर्भ नवदिप कडून अनंत कोटी सर्व महिलांना शुभेच्छा ✍🏻
लेखक व साहित्यिक निर्मलकूमार पंधरे वॄतसंकलन विनोद कंगाले जिल्हा उपाध्यक्ष रा वि पञकार संघ .

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार