एसके जी पंधरे- विदर्भ ब्युरो चिफ
साकोली तालुका प्रतिनिधी:- जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय भंडारा तर्फे रामसागर बहुउद्देशीय संस्था सोनेगाव या संस्थेमार्फत जय हिंद कलापथक संच तर्फे लालबाहादूर विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय गोंड-उमरी येथे कलापथकमार्फत जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील प्राचार्य पी.व्ही. लजे, माजी उपसभापती सभापती वर्षा कापगते, सरपंच अल्का उपरीकर, पत्रकार व सेवानिवृत्त पर्यवेक्षक डी जी रंगारी, पर्यवेक्षक वाय एन मुंगमोडे, मनोज कोटांगले, भावेश कोटांगले इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
जय हिंद कलापथक च्या माध्यमातून शासकीय विविध योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक सुरेश वरकड यांनी केले. तर आभार नारनवरे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी प्रबोधन करणारे व जैन कलापथक संस्था चे कार्यकर्ते मनोज कोटांगले, भावेश कोटांगले, यशवंत बागडे, परलाद भुजाडे, अरविंद शिवणकर, प्रज्ञाशील मेश्राम, स्नेहल, संदीप कोटांगले, अर्चना कान्हेकर, संगीता बागडे, मिथुन जांभूळकर, यांनी मेहनत घेतली.
तर हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कु.के.डी. गाहाने, एस आर वरखडे, टी बी केवट, जी बी कापगते, एस के हातझाडे, बी एस हातझाडे, ज्योती सीताडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक मेहनत घेतली.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार