आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️निलेश देवरे, वंचित बहुजन आघाडी बागलाण तालुका संघटक
सटाना (नामपूर) प्रतिनिधी:- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ऍड. आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व नाशिक जिल्हा अध्यक्ष मा. कपिल भाऊ अहिरे यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व जिल्हा उपाध्यक्ष पदी नामपूर येथील माजी पो.अदि. मा. गोरखराव चव्हाण यांची वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष व नामपूर मानवता प्रतिष्ठानचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते मा. समाधान देवरे यांची जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली.
त्यानिमित्ताने नामपूर येथे श्रीपूरवडे ग्राम पंचायत सदस्य व मोसम प्रतिष्ठानचे मा. जितेंद्र बाप्पू सूर्यवंशी, सुनील निकुंभ, डॉ. सोनवणे, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे ता.उपाध्यक्ष हेमंत सुर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते योगेश गायकवाड, मनोज हरळे, रवींद्र मुन्ना पवार टिंगरी, गणेश सोळंखे, रावसाहेब गायकवाड, बाळासाहेब येशी व आदीवासी कार्यकर्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गोरखराव चव्हाण व समाधान देवरे यांचा ठीकठिकाणी सत्कार घेण्यात आला. व अनेक संघटना पक्ष ग्रुप यांच्या कडून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी चव्हाण व देवरे यांनी वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून गरीब शोषित वंचित यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करू व पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहू असे आश्वासन दिले व उपस्थित मान्यवरांचे व सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
इतर फोटो👇👇

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार