आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
एस के जी.पंधरे -वि. ब्युरो चिफ, महा. राज्य. सहसंघटक पत्रकार
गोंदिया (१६ मार्च) नूकतेच अनेक संघटनांनी विविध नावाचा विचार करून बिरसी विमानतळाला "गोंडवाणा" नाव देण्याची अनेकांनी मागणी केली आहे. भारत एक लोकशाही प्रधान देश असल्याने आपले मत जाहीर करण्याची सर्वांना समान संधी दिली आहे. पण या आधी गोंडवाणा नामक इतिहास समजून घेण्याची इतरांना गरज आहे. कारण सर्वच लोक मंच व साहित्यिक यांचे मते विरवर व क्रांतीनायक शहीदांचे वेष्टण लावून गोंडवाणा हे नाव सुचविले आहे. त्या रक्त रंजित गोंडवाणा वीर भुमिचे वेगळे अस्तित्व त्या निर्माणात, हडप्पा, सिंधू संस्कॄती, द्रविड संस्कॄतीची जननी गोंडीला महत्व प्राप्त आहे.
संशोधनात व गोंडी लिपीत दडलेले आहे. हे प्रत्यक्ष पाहिले आहे हे ञिवार सत्य इतरही प्रांत किंवा देशात सापडत नाही. इतका कणखर वास्तव व जडणघडणीत गोंडवाणा त पुरातन दॄश्यात व कोरीव मुर्त्या ३ हजार वर्षापुर्वी दगड धोंड्या, पहाड दर्या खोर्यात कड्याकपारित वसलेल्या आदिम वसाहतीत सत्य दिसून येते. इथे प्राचीन काळापासून आमच्या राजा महाराजा गोंडाची अधिसत्ता काबिज केलेली होती.
जसे पुर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील गोंडीनार गोंड्या जंगलव्याप्त फळा फुलांनी,भूभाग जल जमीन व जंगल रक्षो रक्षिति समुदयाचा सजलेला गोंड समुदाय इथे वास्तव्यात होता. हे विसरने शक्य नाही. व आमचा सामुहिक हक्क व अधिकार आाहे, म्हणुनच वीरवर शहिदांचे माहात्म्य राखण्यासाठी हा पुर्व विदर्भातील इंग्रजकालीन गोर्या (बिरसी काँलोनी) वसाहतील लढाईत हरल्याऩतर तिथले इंग्रज अधिकाऱ्यांनी हक्क सोडून पलायन केल्या नंतर वीरांची वसाहत असे त्या जागेस बिरसी नाव देण्यात आले.
तेव्हा पासून विमानाने उडाण भरणाऱ्या सम- तळ(भुभागाला) गोंडवाणा नाव देण्याची मागणी रास्त व वास्तव आहे. आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी समाजसेवक यांचा उद्देश आजही जल, जमीन व जंगल वाचविण्यापासून तो गोंडवाणा च्या अंतापर्यत राहणार आहे. आदिवासी विरोधी व्यवस्था मनुवादी विचारसरणीने प्रेरित असून ते आमचे लक्ष्य व पुरातन नावे रद्द करून आपले नावे नाहक पुढे करीत आहेत कारण अशा कोनत्याही गोंडवाणा खेरीज व्यक्ती वा पुरूषाचे नावे देने योग्य होणार नाही.
बिरसी विमानतळा ला गोंडवाणा नाव देण्याची मागणी ईमेल, संदेश अर्ज चर्चेत विविध स्तरावरून, मेसेंजरने तालुका आमगांव देवरी, सालेकसा तालुका तिरोडा, गोरेगांव, अर्जूनी सडक, गोरेगांव साकोली जिल्हा भंडारा तर्फे तहसीलदार तथा जिल्हा गोंदिया जिल्हाधिकारी नयना गुंडे गोंदिया, महाराष्ट्र राज्य मुख्यमंञी व गॄहविभाग महसूल विभागास बिरसा फायटर्स, बिरसा क्रांती दल एम्पलाईज गोंडवाणा मिञ मंडळ गोंदिया इत्यादी संघटनांच्या वतीने अर्ज निवेदने देत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मागणी केली आहे.
गोंडवाणात असंख्य गोंड विर राजांनी शहिदी दिली आहे ते त्यांची कुर्बाणी वाया जाऊ नये. यासाठी गोंदिया बिरसी गोंडवाणा विमाणतळ असे स नाव दिल्यास सार्थक होईल. व गोंडवाणा वीरांना खरी श्रध्दाजली ठरेल जय गोंडवाणा ! जय बिरसा ! जय आदिवासी!
वॄत्तसंकलन - एसके जी .पंधरे
मो:- 9404283750 विदर्भ ब्युरो चिफ तथा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष -बिरसा फायटर्स विदर्भ प्रांत

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार