आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️मा. जितेंद्र अनिराव कुलसंगे, भा.ज.पा. अनुसूचित जमाती मोर्चा नांदेड ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष
नांदेड जिल्हा प्रतिनीधी:- किनवट येथील क्रीड़ा संकुलास भारतीय राज्य घटना मसुदा समिती सदस्य हॉकी खिलाडी जयपाल मुंडा यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत बिरसा क्राती दल नांदेड जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष तथा भाजपा आदिवासी मोर्चा नांदेड जिल्हा ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष मा. जितेन्द्र अ. कुलसंगे यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री मा.अशोकराव चव्हाण यांना निवेदन स्वरुपात मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, आदिवासी महानायक जयपाल सिंह मुंडा हे एक महान खेळाडू होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत हॉकी या खेळाचे प्रतिनिधीत्व केले आणि आपल्या देशाला ऑलम्पिक मध्ये पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले होते. आदिवासी महानायक जयपाल सिंह मुंडा हे उत्कृष्ट खेळाडू, राजनिती तज्ञ, लेखक, संपादक, संविधान तज्ञ असे बहुआयामी सर्वगुण संपन्न होते.
यामुळे ते आदिवासी समाज व ईतर सर्व भारतीयांसाठी सदैव प्रेरणा स्रोत राहतील. तरी मे. साहेबांना विनंती की, सर्व क्रिडाप्रेमी व जनसामान्य जनतेची भावना व समस्त आदिवासी समाजाची भावना लक्षात घेवून किनवट शहरातील तालुका क्रिडा संकूलास जयपाल सिंह मुंडा यांचे नाव देण्यात यावे. हि नम्र विनंती. अशा आशयाचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार