जय आदिवासी युवा शक्ति (JAYS) महाराष्ट्र राज्य च्या वतीने बोगस आदिवासी विरोधात जिल्हाधिकारी यांना निवेदन

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




✍️मद्रास पावरा शिरपूर तालुका प्रतिनीधी

शिरपूर प्रतिनीधी (25 मार्च):- जय आदिवासी युवा शक्ति (JAYS) महाराष्ट्र राज्य च्या वतीने आदिवासी विकास प्रकल्प धुळे येथील प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मा. तृप्ती घोडमिशे यांच्यावर दबाव आणून गुन्हा नोंदवण्याची भाषा करणाऱ्या व स्वतःला बनवे आदिवासी म्हणवणाऱ्यांचे जात प्रमाणपत्र, जात पडताडणी प्रमाणपत्रांची पोलीस दक्षता पथकामार्फत चौकशी करून प्रमाणपत्रे रद करून एट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्या संदर्भात मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी साहेब धुळे यांना निवेदन देण्यात आले.


निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात कोळी समाजाच्या विद्यार्थ्यांना आदिवासी वसतीगृहात प्रवेश नाकारल्याने ते विद्यार्थी अन्याय झाल्याचे भासवून आदिवासी विकास प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष अधिकारी यांच्यावर प्रचंड दबाव आणत आहेत. स्वतःला अन्यायग्रस्त म्हणवून घेणारे कोळी समाजातील विद्यार्थी हे SBC (विशेष मागास प्रवर्गात मोडतात) ज्यांच्यासाठी राज्य शासनाने 3.5% स्वतंत्र आरक्षण बहाल केलेले आहे. असे असतांनाही उत्तर महाराष्ट्रातील कोळी समाज हा स्वतःला आदिवासी म्हणवून घेत मूळ आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कांवर ऊठलाय. स्वतःला टोकरे कोळी म्हणवणारे बांबूपासून टोपल्या विणण्याचा व्यवसाय कधी करत नाहीत. तरीही साम, दाम, दंड भेद नितीचा वापर करून मूळ आदिवासी समाजाला देशोधडीला लावत आहे.


तरी महोदयांना सदर तक्रारी निवेदनाद्वारे विनंती की, अशा जातचोरीला कायमचाच पायबंद घालण्यासाठी आणि मूळ आदिवासी समाजाच्या सरकारी नोकऱ्या, उच्चशिक्षणातील प्रवेश, राजकिय आरक्षण वाचवण्यासाठी आपणांकडून कठोर कारवाई करण्यात यावी. आणि त्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प धुळेच्या कर्तव्यदक्ष अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मा. तृप्ति धोडमीशे मॅडम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाषा करणाऱ्या व तथाकथित बोगसांची पोलिस दक्षता पथकाकडे तक्रार करून, त्यांचे दस्तावेज, चालिरीती, परंपरा, रूढी आदींची तपासणी करून वेळप्रसंगी एट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सुचना आपल्या स्तरावरून निर्गमित कराव्यात ही नम्र विनंती. अन्यथा मूळ आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. असा इशारा जय आदिवासी युवा शक्ति (JAYS) महाराष्ट्र राज्य च्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


यावेळी निवेदन देण्यासाठी जय आदिवासी युवा शक्ति (JAYS) संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.डॉ. हिरालाल पावरा सर, मा. योगेश पावरा, मा.डॉ. जगदीश पावरा, मा. भूपेश पावरा, मा. प्रविण पावरा, मा. दिपक पावरा, मा. मुकेश पावरा, मा. डॉ. महेश पावरा, मा. डॉ. संजीव पावरा इत्यादि पदाधिकाऱ्यांसह आदिवासी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

झाले