राजेंद्र मरस्कोल्हें यांची राष्ट्रीय अनुसुचित जनजाती आयोगावर (NCST) नियुक्ती

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




भारताच्या संविधान अनुच्छेद 338 चा वापर करून दिवानी न्यायालयाच्या शक्तीचा प्रयोग करणारा एकमेव निगम 


आदिवासी हक्क व अधिकारांचा लढा भारतीय घटनेनुसारलढवय्या संघटक राजेंद्र मरस्कोल्हे (अध्यक्ष आफ्रोट ची ओळख.)

 

संघटन शक्तीने समाज हितार्थ  उभारलेला लढा बोगसाविरूधात वापरा - प्रदेशाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे बिरसा फायटर्स  विदर्भ 



एसके जी.पंधरे विदर्भ ब्युरो चिफ

महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ (भारत सरकार मान्य)


साकोली प्रतिनीधी (१८मार्च ):- राष्ट्रीय अनुसुचित जनजाती आयोग National Commisdion for Schedul led Tribes) भारत सरकार भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 338 अंतर्गत दिवानी न्यायालयाच्या शक्तीचा एक संविधानिक आयोग म्हणुन ज्याची ओळख आहे असे सरकारी संस्था राजेंद्र मरस्कोल्हे यांची दि १७/०३/२२ F.No. NCS T-04/0Mon/2/2022- RMD C बोगस सर्टीफिकेट होण्यापासून थांबविण्यासाठी चार सदस्यीय कमेटीत निवड करण्यात आली. त्यात 

  • 1) अध्यक्ष अनंत नायक, Ncst. 
  • 2) श्रीमती:अलका तिवारी सचिव
  • 3)डाॅ जि एस सोमावत, एक्स डायरेक्टर,जयपुर - सदस्य
  • (4). श्री राजेद्र मरस्कोल्हे नागपूर


आदिवासी प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रातून आफ्रोटचे अध्यक्ष राजेंद्र दादाजी मरस्कोल्हे एक धुरंदर, समाजसेवक व बोगसांचे कर्दनकाळ असी ओळख असलेली व्यक्ती आहेत. त्यांची निवड समाजासाठी फायद्याची ठरावी कारण त्यांच्या निवडीने समाजाच्या आणखीनच आशा व आकांक्षा वाढीस लागल्या आहेत. त्यांनी उभारलेला लढा कोर्टात सरकार च्या कक्षेत असला तर ते सदर नियुक्तीमुळे शैक्षणिक, प्रशासकीय लढ्याला धार निश्चित देतील अशी इच्छा दिनेश बाबूराव मडावींनी केली आहे.आणि अभिनंदन केले आहे.


आदिवासी समाजाप्रती बोगस लढा असो की इतर समस्यांना रेटून नेण्यास त्यांचा अनुभव व कनखर नेतृत्व जिद्दी, चिकाटी कामी येईल आणि ते सरकारला बाद्धे करतील असे म्हटले आहे.


राज्य सरकार व केंद्र सरकारच्या 595560 च्या वर बोगस आदिवासी नोकर्‍यात कार्यरत आहेत त्या बोगसांच्या कब्ज्यातील बळकावलेल्या जागा रिका- म्या करून हक्काच्या जागा आदिवासी बेरोजगारांना मिळवून देतील. केंद्रसरकार आदिवासी बजेटवर अब्जो रूपये खर्च करण्याचे दावे करतो. भारत देश ७५ व्या वर्षात आझादीचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असतांना त्या प्रमाणात आदिवासी समाजाचा विकास झाला का ? हे पाहने औचित्याचे आहे. हा समाजाच्या कल्याणाचा प्रश्न येरणीवर पडू नये हिच परम् सदिच्छा! शिक्षण क्षेञ, वनक्षेञ, शेती, सिंचन, आदिवासी महामंडळ, शबरी महामंडळ TRTI तील सावळा गोंधळ, आर.आर.एस. प्रणित वनवासी कल्याण आश्रम मंडळाचे आदिवासी समाजातील कार्य, चेतना परिषदेचे कार्य, आदिवासी निसर्गपूजक समाजाच्या हिंदुकरणाचा प्रश्न व अनेक आदिवासी धार्मिक, समाज समस्या आवासून पहात आहेत ? त्याची जाणीव राजेंद्र मरस्कोल्हे यांना आहे. त्या दॄष्टीने त्यांची वाढलेली जबाबदारी व अनेक देशातील भारतीय वीर शहीद बिरसा अनुयायांचे अधिकार व हक्क मिळविण्याचा सप्तरंगी विकासाचा ध्वज पताका कसे पेलवतील हे येणारा काळ सांगेल.


आपण सच्चा जबाबदार समाज सेवक व समाजनिष्ठ कार्य कर्ता या नात्याने आपण समाज कसोटीवर खरे उतर‌ाल अशी संघटनाच्या वतीने हड्डप्पा मोहनजोद्रो संस्कॄती गृपवर अपेक्षा व मागणी केली आहे. जय सेवा। जय बिरसा।जय आदिवासी जय सेवा जोहार! जय संविधान । 


लेख- दिनेश बाबुराव मडावी 9403111111  

वृतसंकलन:- एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ व प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स विदर्भ




Post a Comment

0 Comments

झाले