आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
एसके जी पंधरे- विदर्भ चिफ व महाराष्ट्र राज्य सहसंघटक, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ (भारत सरकार मान्य)
मुंबई:- (23मार्च) इंडीयन प्रिमियर लीगच्या 15 व्या हंगामाला दि. 26 मार्च 2022 पासून सुरवात होत आहे. तत्पुर्वी आयोजकांनी प्रेषकांना क्रिकेटसंबधी गतवर्षीचा विजेता चेन्नई सुपरकिंग संघ विरूद्ध उपविजेता कोलकाता नाईट राईडर्स सोबतचा पहिला सामन्याचा संघर्षमय व थरारक खेळ CSK चे एमएस धोनी च्या व KKR चे श्रेयश अय्यरच्या कप्तानीत क्रिकेट चा दंव्द पहायला मिळणार आहे. हि मॅच क्रिडा रसिंकाना मुंबईच्या वानखेडे स्डेयिमवर पाहावयास मिळणार असल्याचे विशेषवृत्त आहे.
आयोजकानी बुधवारी सांगितले की स्टेडीयमच्या एकून प्रेक्षक क्षमतेच्या 25% क्रिडाप्रेमी रसिकांना परवानगी दिली आहे. यावेळी ऑफलाईन आपआपल्या टिमला हुर्र देवून प्रतिसाद देता येईल व खेळाडुंचा आत्मविश्वास दुनावता येईल. आजपासूनच चाहत्यांना ऑनलाईन तिकिट बुक करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हा सामना महत्वाचा प्रसंग असेल कारण IPLसाथीच्या रोगा मुळे विश्रांतीनंतर स्टेडीयमध्ये पुन्हा स्वागत करेल. असे आय पी एलच्या प्रकाशनात म्हटले आहे.
मुंबई, नवी मुंबई, पुणे स्टेडीयम येथे सामने खेळविले जातील.
ज्यामध्ये कोविड19 प्रोटोकॉल नुसार स्टेडीयमच्या एकूण 100 पैकी क्षमतेच्या 25% टक्के क्षमतेत रसिक बसून सामना पाहु शकतील.
आयपीएलच्या लखनऊ सुपर जायंट्स व गुजरात टायटंस या दोन नवीन संघाच्या समावेशामुळे या हंगामातील संघांची संख्या दहा झाली आहे. यामुळे हंगामातील एकुण सामन्यांची संख्या74 झाली आहे.


0 Comments
जय आदिवासी
जय जोहार