आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांचे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे ( TRTI ) येथे बेमुदत धरणे आंदोलन

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)





आदिवासी संशोधक विद्यार्थी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,  पुणे ( TRTI ) येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत. त्यांच्या पाठीशी आपण आदिवासी बांधव उभे राहू या 

 त्यांना ताकद देऊया...

 जय आदिवासी, जय बिरसा...


🟦 आदिवासी समाज बांधव व संघटनांनी गुरुवार, ३१ मार्च २०२२ रोजी दुपारी ठीक १२ वाजता TRTI समोर एकत्र यावे हे नम्र आवाहन...

✍️डॉ.संजय दाभाडे सर, पुणे, 9823529505


पुणे प्रतिनिधी:- आदिवासी संशोधक विद्यार्थी कृती समिती, ( म्हणजे पी. एच. डी. करणारे आदिवासी विद्यार्थी ) महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्राच्या काही विद्यापीठांमधील आदिवासी संशोधक विद्यार्थी पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थे ( TRTI  ) समोर सोमवार, दिनांक २८ मार्च २०२२ पासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत.  विद्यार्थ्यांचे म्हणणे एकच आहे की आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था गेली साठ वर्षा पासून अस्तित्वात आली आहे. परंतु त्यांनी अजून पर्यंत आदिवासी पी.एच.डी. PhD  करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याच्या बाबतीत योजना सुरू केली नाही. त्या तुलनेने बार्टी महाज्योती,  सारथी यासारख्या अत्यंत अलीकडच्या संस्थानी देखील त्यांच्या त्यांच्या  सामाजिक समूहातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप खूप पूर्वीच  सुरू केली आहे.


या पार्श्वभूमीवर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थे ने विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार जो आधीचा प्रस्ताव पाठवला त्याला शासनाची मान्यता मिळू शकली नाही कारण की त्या प्रस्तावात असंख्य चुका होत्या. आता विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यावर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी १६ मार्च २०२२ रोजी नवीन प्रस्ताव पाठवला....! आताचा हा नवीन प्रस्ताव योग्य आहे त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु त्याला पाठवायला फार उशीर झाला तर दुसरीकडे राज्यशासनाने सुद्धा त्या बद्दल जोरदार हालचाली करायलाच हव्यात.


विद्यार्थ्यांची मागणी आहे की ताबडतोब शासनाने शासन निर्णय प्रसिद्ध करावा व त्याआधी फेलोशिप च्या संदर्भात जाहिरात सुद्धा ताबडतोब प्रसिद्ध करावी. आदिवासी विद्यार्थ्यांनी किती काळ वाट बघावी, किती काळ प्रतीक्षा करावी याला काही मर्यादा आहेत याचे भान आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ.भारुड व प्रशासन आणि शासनाला असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीमध्ये न्याय मिळण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा मार्ग निवडन्या शिवाय पर्याय उपलब्ध नव्हता.


या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमधील सर्व आदिवासी बंधू व भगिनी, आदिवासी राजकीय नेते आणि आदिवासी संघटनांनी या संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ताबडतोब उभे राहण्याची गरज आहे. त्यासाठी गुरुवार दिनांक ३१ मार्च रोजी दुपारी ठीक बारा वाजता सर्व आदिवासी बंधू-भगिनी, संघटनांचे पदाधिकारी व संघटनांचे कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी म्हणजे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या गेट जवळ जमावे असे नम्र आवाहन करत आहोत...


समाज आहे म्हणून आम्ही आहोत.....

उलगुलान जारी है...जारी रहेगा...


 डॉ.संजय दाभाडे, 

    पुणे,

   9823529505

sanjayaadim@gmail.com

Post a Comment

0 Comments

झाले