प्रकाशा जि.प.कन्या शाळेत शाळा पुर्व तयारी मेळावा ( Pre-School Preparatory ) संपन्न






✍गोपाल गावित सर ( Gopal Gavit ), जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना 
मो.नं. 9527722072
गोपाल गावित सर








नंदुरबार दि.१३ (रयतेचा कैवारी प्रतिनिधी गोपाल गावीत) शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा व जिल्हा परिषद मुले, उर्दू शाळा प्रकाशा ( Prakasha Z.P School ) यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे ( Pre-school preparatory ) आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास प्रकाशा केंद्राचे ( Prakasha Kendra ) केंद्रप्रमुख आर.एम. धनगर, पं.स. सदस्य जंग्यादादा भिल, शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे उदघाटक म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार अधिव्याख्याता डॉ. वनमाला पवार यांची उपस्थिती होती.





कार्यक्रमास गावातील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, व  सदस्य, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, पालक विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षक आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या रूपरेषा नुसार सुरुवातीला सर्व  मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नव्याने  दाखल होणाऱ्या पालक विद्यार्थ्यांसह  संपूर्ण गावांमधून वाजत-गाजत, शैक्षणिक घोषणा देत, प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरी मध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन केंद्रप्रमूख यांनी पालक, ग्रामस्थ, यांना आपल्या मुलांना शाळेत प्रवेशीत करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण ( Education ) किती महत्वाचे आहे हे पटवून दिले. 


त्यानंतर जंग्या दादा भिल, डॉ.वनमाला पवार मॅडम व केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांच्या हस्ते शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्ज्वलन केले व अधिकृतपणे कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर नव्याने दाखल होणाऱ्या बालकांचे औक्षण करून पालकांसोबत फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले व दिलेल्या नियोजनाप्रमाणे बालकाची आनंददायी वातावरणात,

  1. नाव नोंदणी, 
  2. शारीरिक विकास, 
  3. सामाजिक व भावनिक विकास,
  4. बौद्धिक विकास, 
  5. भाषा विकास, 
  6. गणित पूर्वतयारी 

अशा सर्व विभागांमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक नोंदणी करण्यात येऊन त्या विद्यार्थ्यांना शाळा पूर्वतयारी साठी शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले. 


सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांनी उपस्थित सर्व पालक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे महत्त्व पटवून दिले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य मिळाले.



Post a Comment

0 Comments

झाले