जि.प. उच्च प्राथमिक शाळा दलेलपूर येथे शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न



Z.P.-Pre-school-preparation-meet-held-at-Primary-School-Dalelpur

✍राजु प्रधान, अध्यक्ष जि.प. शालेय शिक्षण समिती

नंदुरबार प्रतिनिधी:- दिनांक 13/04/2022 वार बुधवार रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दलेलपूर ( Z.P. High Primary School Dalelpur ) ता. तळोदा जि. नंदुरबार ( Nandurbar ) येथे शाळापूर्व तयारी मेळावा अतिशय उत्साही, आनंदी वातावरणात संपन्न झाला. श्रीमती. हिनाताई गावित, संसदरत्न खासदार नंदूरबार लोकसभा मतदार संघ ( Heenatai Gavit ) यांच्या हस्ते फित कापून मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन, दिपप्रज्वलन करण्यात आले.



श्री सतीश चौधरी ( शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि प नंदुरबार ), श्री शेखर धनगर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती तळोदा, श्रीमती अलका जयस्वाल केंद्रप्रमुख, केंद्र तळोदा यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.




कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती हिनाताई गावित खासदार संसदरत्न, नंदुरबार लोकसभा मतदार संघ व प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रामानंद ठाकरे नगरसेवक नगरपरिषद तळोदा, श्री. दिपक पाडवी सामाजिक कार्यकर्ते तळोदा, श्रीमती रेखाताई वसंत पाडवी, मा. सभापती प स तळोदा, श्री देवेंद्र पाडवी पोलिस पाटील दलेलपूर उपस्थित होते.


तत्पूर्वी मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत शाळेच्या विद्यार्थीनी व ग्रामस्थांनी आदिवासी ( Adivasi ) नृत्य ग्रामपंचायत भवन ते शालेय आवार ढोल तालावर सादर करून केले. टेबल क्रमांक 01 ते 07 सर्व माहिती सर्व मान्यवरांना देण्यात आली व दाखल पात्र विद्यार्थी ( Student ) यांच्या शाळापूर्व तयारीची नोंदी टेबल क्रमांक नुसार घेण्यात आली.



अध्यक्षीय भाषणात श्रीमती हिनाताई गावित यांनी आपल्या मनोगतात शाळापूर्व तयारीची आवश्यकता व गरज याविषयीची विद्यार्थी व पालक माता यांना समजावून दिले व त्यांची शिक्षणासाठीची धडपड, आस्था हे त्यांनी एकलव्य विद्यालयाची संकल्पना यातून समजावून दिली.


श्री राजू प्रधान ( Raju Pradhan ), अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती दलेलपूर श्री संतोष मराठे, अजय धानका, आकाश धानका, पप्पु धानका, राजेश मराठे, शालेय व्यवस्थापन समिती, सदस्य गण यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य व मेहनत घेतली.

 
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन / प्रास्ताविक श्री. नितिन महाजन सर यानी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्रीमती सोहनी मॅडम, शाळेतील सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजु प्रधान, सदस्य, अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई, आशाताई, गावातील तरुण स्वयंसेवक यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमच्या शेवटी उपस्थितांचे आभार श्री. बलदेव पवार, विषय शिक्षक जि. प. उच्च प्राथमिक शाळा दलेलपूर ( Dalelpur ) यांनी केले. व राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments

झाले