महाराष्ट्रातील विद्यापिठामध्ये संशोधन अध्यासन "केंद्रप्रमुख" आदिवासी समुहातून घेण्यात यावे -के.सी. पाडवी




अध्यासन केंद्रास जयपालसिंग मुंडा, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, या आदिवासी महानायकांचे नावे देण्यात यावे:- आदिवासी विकास मंत्री



✍एसकेजी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ, सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ



मुंबई :-(६ एप्रिल) महाराष्ट्रातील विविध विद्यापिठामध्ये वेगवेगळ्या विषयावर अध्यासन केंद्र (study centers) चालवून त्या विषयाच्या अनुसंघाने संशोधनाचे समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. आदिवासी समुहाच्या बाबतीत सुध्दा विद्यापिठ प्रशासन अनभिज्ञ राहू नये म्हणुन प्रशासन कुलगुरू व राज्यपालाचे लक्ष वेधण्यासाठी प्रसिध्द कवियीत्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ येथे अध्यासन केंद्र सुरु करावे. व त्या अध्यासन केंद्रास तत्कालीन भारतीय संविधान समिती उप- समिती सदस्य जयपालसिंग मुंडा, शहिद बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, किंवा त्या त्या परिसरातील आदिवासी महानायकांचे नाव देण्यात यावे. व त्या अध्यासन केंदाच्या प्रमुखाची नेमणुक आदिवासी समुहातून करण्यात यावी. के. सी. पाडवी साहेब यांनी अशा आशयाचे पत्रकातून त्यांनी सरकारचे प्रति संवेदना प्रकट करित कुलगुरू, कवियीत्री बहीनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र  विद्यापिठ जवगांव जिल्हा जळगां‌व यांचेकडे मागणी केली आहे.

तसेच अशा प्रकारच्या मागणीचे सर्व आदिवासी संघटनांनी इतर विद्यापिठात असे उपक्रम राबवून आपआपल्या सामाजीक संघटनांनी लेटर पॅडवर राज्यपाल तसे त्या त्या विभागातील संबंधीत विद्यापिठ प्रशासन व कुलगुरूंना निवेदन देत मागणी लक्षात आणुन देण्यात यावे असे सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स  विदर्भप्रांत तथा सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे वतीने प्रसार माध्यम व प्रतिनिधीसी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.

असे जर  झाले तर आपल्या शहीद वीरांचा इतिहास पुढे आणण्यास निश्चित मदत होईल व या कामी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर या कामी पुढे यावेत असे आवाहन केले आहे.


आदिवासी युवा आता YouTube  वरही उपलब्ध🙏 चॅनेल आत्ताच SUBSCRIBE करा👍

https://youtube.com/channel/UC3dk-NqPkDV3CHV8a-J-OSA


Post a Comment

0 Comments

झाले