आज अजमीर सौंदाणे येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्सव साजरा करण्यात आला .कार्यक्रमाची सुरुवात हि गावातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून सुरवात करण्यात आली.
मग नंतर ग्रामपंचायत अजमिर सौदांणे येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले त्यावेळी ग्रामपंचायत अजमिर सौदांणेचे लोकनियुक्त सरपंच धनंजय पवार, उपसरपंच दिपक शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य, भाऊसाहेब,त्याच प्रमाणे समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमात उपस्थिती मध्ये अजमीर सौंदाणे ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून ग्रामपंचायत सरपंच धनंजय पवार यांनी आपले विचार मांडले.व श्री कडु दादा सोनवणे सर यांनीही आपले विचार मांडले व निलेश देवरे यांनीही आपले विचार मांडले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार