नंदुरबार दि.१४(रयतेचा कैवारी ऑनलाईन वृत्तसेवा) नवापूर तालुक्यातील जि.प. शाळा बोरवण (Z.P. School Borvan ) येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti ) उत्साहात साजरा करण्यात आली. सर्वप्रथम गावातून ढोल वाजवत प्रभात फेरी काढून घोषणा देण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar ) यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापिका यशोदा वसावे यांच्या हस्ते करण्यात आले.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र व त्यांच्या कार्याबद्दल माहिती व चित्रकला रंगभरण स्पर्धा घेतली. ३ री व ४ थी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले. कोविड १९ काळानंतर खूप दिवसांनी विविध कार्यक्रम होतांना विद्यार्थ्यांच्या मनावर आनंद दिसत होता. गावातील पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील माहिती व त्यांचे कार्याविषयी माहिती शिक्षक दिलीप गावीत यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका यशोदा वसावे यांनी केले व उपस्थितांचे आभार शिक्षक दिलीप गावीत यांनी मानले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार