वैजाली जि.प.शाळेत शाळापुुर्व तयारी मेळावा संपन्न


   



✍गोपाल गावित सर ( Gopal Gavit ), जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना 
मो.नं. 9527722072
गोपाल गावित सर









नंदुरबार दि.18 ( प्रतिनिधी)
शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजाली येथे या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली मध्ये दाखल होणा-या बालकांसाठी व त्यांच्या पालकांसाठी विशेषत्वाने शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला. गत दोन वर्ष ही बालके अंगणवाडी मध्ये कोरोनामुळे येऊ शकली नाहीत, मूलभूत क्षमतांना गती मिळावी हा उद्देश प्रामुख्याने समोर ठेवून या मेळाव्याच्या माध्यमातून यापुढे हे सारे आकाश माझेच आहे ही भावना, हा आत्मविश्वास मुलांमध्ये निर्माण केला गेला.




शाळेच्या प्रवेश द्वारापासून वर्गापर्यंत चिमुकल्या बालकांचे पुष्पवृष्टी करत फुले देऊन स्वागत करण्यात आले. चाॅकलेट व टोपी मिळाल्याने मुलांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता. सेल्फी बॉक्स व बालकांचे ठसे हस्तमुद्रा लक्षवेधी ठरत होत्या. मुुलांंनी सेल्फी पाॅॅईंट वर फोटो घेतला.स्टॉलच्या माध्यमातून नावनोंदणी करीत असताना वजन व उंची घेत बालकांचे विकासपत्र माता पालकांकडून माहिती घेेण्यात आले. मुख्याध्यापक  सुदाम पाटील यांनी दिली.

 


शारीरिक विकासांतर्गत मुलांना दोरीउड्या मारणे, योग्य ठिकाणी रिंग फेकणे, बादलीमध्ये अचूक चेंडू फेक इ. खेळ कौशल्ये करताना मुलांनी भान हरपून सहभाग नोंदवला. विशेषतः यामध्ये माता पालकांचा उत्साही प्रतिसाद होता. याविषयी माहिती राजु मोरे यांनी दिली.यानंतर बौद्धिक विकासांतर्गत चित्र शब्द जोड्या, भौमितिक आकार व त्या स्वरूपाच्या वस्तू शोधणे. लहान मोठे पणा संबोध असे विविध सृजनात्मक उपक्रम राबविण्यात आले.याविषयी माहिती भरत  पावरा यांनी दिली. सामाजिक व भावनिक विकासांतर्गत कुटुंब संस्था नातेसंबंध, कुटुंबातील व्यक्तींची नावे सांगणे, परिसराशी समरस होत मैत्रभाव, प्रेम, आपुलकी निटनेटकेपणा यासंदर्भाने बालकांना बोलते करून सुसंवाद साधला गेला. याविषयी माहिती चंदु पाटील यांनी दिली.




भाषा विकासाच्या अनुषंगाने चित्रमय मुळाक्षरे, अक्षरलेखन, बडबड गीते, चित्र वर्णन, छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या, मुलांकडून या कृती करून घेण्यात आल्या. गणनपूर्व तयारी मध्ये मणी, गोट्या, पाने, खडे मोजणे अंकाचे गाणे म्हणणे इ. बाबी कौशल्याने आत्मसात करण्याविषयी माहिती उषा पाटील यांनी दिली. सर्वात शेवटच्या स्टॉलवर बालमानसशास्त्राचा आधार घेत आपल्या बालकांना घडविताना कोणकोणत्या बाबींवर लक्ष देणे ते कसे देणे. यामध्ये आपले घर, परिसरातील वातावरणात कसे ठेवावे, मुलांना विविध शैक्षणिक बाबीत कसे गुंतवून ठेवावे यावर मार्गदर्शन गोपाल  गावीत यांनी व्यक्त केले.


 



गावातूून मुलांबरोबर,पालक व शिक्षक यांनी घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली होती.स्वयंसेवक म्हणून लाभलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले अमूल्य योगदान दिले. मुले व उपस्थित पालकांना चाॅकलेट वाटप करण्यात आले. माजी सरपंच विनोद पाटील यांनी आपले योगदान दिले. मान्यवरांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शाळा  व्यवस्थापन  समिती प्रविण पाटील यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाचे स्वागत उषा पाटील यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुदाम पाटील यांनी केले.तर सूत्रसंचालन भरत पावरा यांनी केले. यावेळी अंगणवाडी सेविका,मदतनीस, पालक उपस्थित  होते.



Post a Comment

0 Comments

झाले