अक्कलकुवा तालुक्यातील आमलीबारी जि.प.शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न

आमलीबारी जि.प.शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न   नंदुरबार  दि.१९...अक्कलकुवा तालुक्यातील जि.प मराठी शाळा आमलीबारी येथे शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न झाला. नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत निपुण भारत या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू होत आहे.या मध्ये राज्यात स्टार्स प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असून त्या अंतर्गत शाळा पूर्वतयारी अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमातून सन २०२२-२३ मध्ये इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या मुलांचे कोरोना कालावधीत झालेल्या अध्ययन क्षय शिक्षक,पालक यांच्या मदतीने भरुन काढणेसाठी शाळा स्तरावर दोन मेळावे आयोजित करून मुलांच्या विविध क्षमता ह्या पाहता येणार आहेत. या निमित्ताने  जि.प.शाळा आमलीबारी ता.अक्कलकुवा  शाळेत आज पहिल्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन अक्कलकुवा पं.स.सदस्या लक्ष्मी पाडवी यांच्या हस्ते झाले. या वेळी ग्रामस्त,पालक,स्वंयसेवक इ. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. गावामध्ये फेरी मारून जनजागृती करण्यात आली व इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांचे स्वागत औक्षण करुन व चॉकलेट,फुगे देवून करण्यात आले. पालकांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमा पूजनाने सुरुवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक दिवान पाडवी यांनी केले. तर शाळापूर्व तयारी मेळावा संकल्पना ,स्वरुप,गरज,साहित्याची ओळख व वापर संदर्भात सुनंदा भावसार यांनी माहिती दिली. मेळाव्याच्या ठिकाणी  विविध प्रकारचे सात स्टॉल मांडण्यात आले होते. त्या विविध स्टॉलवर साहित्यांची मांडणी करण्यात आली होती. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दाखलपात्र मुलांच्या पालकासह प्रत्येक स्टॉलला भेट देऊन त्या ठिकाणी मुलांच्या विविध क्षमता तपासण्यात आल्या,व त्या प्रतिसादाची नोंद विकासपत्रामध्ये करण्यात आली.  सुटीच्या कालावधीत मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी पालकसमूह तयार करून त्यांना 'आयडीया कार्ड' व विद्यार्थी यांच्यासाठी 'पहिले पाऊल' हे पुस्तक व  कृतीपत्रिका कार्ड संच देण्यात आला. या मेळाव्यात सर्व दाखलपात्र विद्यार्थी व पालकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मूख्याध्यापिका बबिता वळवी,शाळेतील शिक्षिका  सुनंदा भावसार,शिक्षक दिवान पाडवी, अंगणवाडी सेविका रिना वळवी व सुनिता वळवी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनंदा भावसार यांनी केले तर उपस्थितांचे आभार बबिता वळवी यांनी मानले. शाळा पूर्वतयारी मेळाव्यासाठी गटशिक्षणाधिकारी अशोक देसले व केंद्रप्रमुख मोहन बिसनारिया यांनी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्यात.

Post a Comment

0 Comments

झाले