बिरसा क्रांती दल शिरपूर तालुका अध्यक्ष पदी मा. श्री मिथुन पावरा सर यांची निवड



✍मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल  मो-9307691872

धुळे जिल्हा - बिरसा क्रांती दलाच्या झेंड्याखाली आदिवासी समाजातील ४५ जमातीतील परिवर्तनशील युवक जागरूक शिक्षित कर्मचारी यांना संघटीत करण्याचा निर्णय बिरसा क्रांती दलाने घेतला आहे. समाजातील अशा घटकांना संघटीत करण्याची धारणा स्वावलंबना स्विकार ही सर्व श्रेष्ठ गोष्ट असते. समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी,  प्रगतीसाठी, आत्मसन्मानासाठी, अस्तित्व, अस्मिता व संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे या संघटनेच्या शिरपूर तालुका अध्यक्ष पदी मा. श्री मिथुन पावरा सर यांची निवड आज दि.२०-०४-२०२२ रोजी बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री दशरथ मडावी साहेब यांच्या आदेशानुसार ऑनलाईन मिटिंग द्वारे करण्यात आली. 


यावेळी उपस्थित बिरसा क्रांती दल संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री रंगरावजी काळे साहेब, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. श्री डी बी अंबुरे सर, महाराष्ट्र राज्य सचिव मा.श्री चिंधू आढळ, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा .श्री विजय आढारी, महाराष्ट्र राज्य महिला फोरम अध्यक्षा गिरिजा ताई उईके, नाशिक विभागीय अध्यक्ष मा. रोहित दादा पावरा, शिरपूर महिला अध्यक्षा सुनिता पावरा, नाशिक जिल्हा अध्यक्ष एकनाथ गायकवाड, जिल्हा कार्या अध्यक्ष मा. अशोक जाधव, जिल्हा उपाध्यक्ष मा. भगवान देशमुख, मा. मधुकर पाडवी, जिल्हा महासचिव मा .किशोर माळी, नंदूरबार जिल्हा अध्यक्ष मा, शिलेदार पावरा सर, दिंडोरी तालुका उपाध्यक्ष मा. शंकर वासले, पुंडलिक वाघेरे, नाशिक तालुका अध्यक्ष हभप श्री पुंडलिक पिंपळके सर, नांदगाव तालुका अध्यक्ष मा. हिरालाल देशमुख इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

झाले