आदिवासी समाजाची बदनामी करणाऱ्या अभिनेत्री राखी सावंतवर एट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करा -बिरसा क्रांती दल.

आदिवासी युवा (Adiwasiyuva.com)



मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल  मो-9307691872

नाशिक जिल्हा- अंगप्रदर्शन अश्लील व्हिडिओ द्वारे आदिवासी समाजाची बदनामी करणाऱ्या व समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अभिनेत्री राखी सावंतवर सायबर क्राईम व ॲट्राॅसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा अशी मागणी बिरसा क्रांती दल नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मधुकर पाडवी यांनी पोलिस निरीक्षक साहेब पेठ तालुका पोलिस स्टेशन यांना निवेदन देऊन केली आहे.



निवेदनात असे म्हटले आहे की अभिनेत्री राखी सावंत यांनी आदिवासी समाजाला उद्देशुन अश्लील अंगप्रदर्शनाची कृती करत व्हिडिओ बनवून तो इंस्टाग्राम व व्हाटस्पॲप अशा सोशल मीडियावर टाकून संपूर्ण आदिवासी समाजाची बदनामी केली आहे व आदिवासी समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ, संताप निर्माण होईल यासाठी आक्षेपार्ह वाईट कृती केली आहे. राखी सावंतच्या या वाईट कृत्याचा आम्ही बिरसा क्रांती दल नाशिक जिल्हा संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो राखी सावंत यांनी "मेरा ये लुक देख रहे हैं, आज पुरा ट्रायबल लूक, आदिवासी आदिवासी इसको कहते हैं, हम तो लुकस हैं और ये देखिये भुम भुम टरारा भुम भुम!" असं अश्लील शब्दात अश्लील शारीरिक कृतीतून आदिवासी समाजाला  बदनाम केले आहे.आदिवासी समाज शांतताप्रिय व प्रामाणिक आहे. या शांतताप्रिय समाजाला अश्लील व्हिडिओ द्वारे जाणीवपूर्वक भडकावण्याचे काम राखी सावंत यांनी केले आहे.


स्त्रीयांची लाज, लज्जा, मर्यादा तोडून अश्लील कृती द्वारे स्त्री जातीला सुध्दा कलंकित केले आहे. राखी सावंत यांच्या या सोशल मीडियावरील अश्लील व्हिडिओमुळे आदिवासी समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. व राखी सावंत बद्दल आदिवासी समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. राखी सावंतच्या विरोधात देशभर आदिवासी संघटनांकडून निषेध नोंदविला जात असून फौजदारी कारवाईसाठी मागणी केली जात आहे. तरी  अंगप्रदर्शनाच्या अश्लील कृतीतून जाणीव पूर्वक आदिवासी समाजाची बदनामी करणाऱ्या आदिवासी समाजात तेढ, प्रचंड संताप निर्माण करणाऱ्या अभिनेत्री राखी सावंत यांच्यावर सायबर क्राईम व ॲट्राॅसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून  तात्काळ अटक करण्यात यावी.

 
यावेळी योगिराज भांगरे, नाशिक जिल्हा महासचिव किशोर माळी, इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

झाले