घोगळपाडा येथे शाळापूर्व तयारी अभियान उत्साहात साजरा
नंदुरबार दि.१९...जि.प.प्राथ.शाळा घोगळपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिला मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे आकर्षण म्हणजे प्रवेशपात्र मुलांचे स्वागत करण्यात आले. मुलांनी ढोलाच्या तालावर सुंदर नृत्य केले. मागील दोन वर्षे कोविड १९ मुळे बंद झालेल्या शाळा व अंगणवाडी यामुळे विद्यार्थ्यांना शाळेचा कसलाच संबंध आला नव्हता, म्हणून या मेळाव्यातून इयत्ता पाहिलीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश पूर्व तयारीसाठी विविध क्षमता विकसन चाचपणी साठी या मेळाव्यात रॅली,जनजागृती,विविध,खेळ स्टॉलच्या माध्यमातून नाव नोंदणी करणे, वजन, उंची,शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, गणनपूर्व तयारी व पालकांना मार्गदर्शन असे विविध उपक्रम घेण्यात आले. नवीन दाखलपात्र विद्यार्थ्यांचे स्वागत केले गेले. त्यांच्याकडून विविध प्रात्यक्षिके करून घेण्यात आले. यासाठी गावातील सखी सावित्री समिती यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. या मेळाव्यासाठी जुबेर तांबोळी सर केंद्रप्रमुख, शा.व्य समिती अध्यक्ष अमृत वळवी, उपाध्यक्षा नंदिनीताई पाडवी, शिक्षणप्रेमी दिलीप गावित व सर्व सदस्य, सखी सावित्री समिती सर्व सदस्य, मुख्याध्यापक रोहिदास जाधव सर ,शाळेतील शिक्षकवर्ग अनिल वळवी सर कविता पाटील, ललिता वळवी, निदेश वळवी सर, रवींद्र कोकणी सर तसेच सर्व स्वंयसेवक,आशाताई,अंगणवाडीताई तसेच ग्रामस्थ व अनेक मान्यवर उपस्थित होते. जाधव सर मुख्याध्यापक यांनी सर्वांचे स्वागत केले शाळेतील शिक्षक निदेश वळवी यांनी शाळा पूर्व तयारी उपक्रमाची माहिती सर्व उपस्थित पालकांनी दिली. केंद्रप्रमुखांनी मार्गदर्शन करून मुलांचा उत्साह वाढवला. कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. सर्व पालक, उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थी यांचे शाळेतील शिक्षक निदेश वळवी यांनी आभार मानले. व कार्यक्रम संपन्न झाला.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार