नंदुरबार दि.२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आकांक्षित नंदुरबार जिल्ह्य़ातील विविध विभागातील विकास कामे पाहणीनुसार आधुनिक तंत्रज्ञाचा तंत्रज्ञाचा उपयोग विद्यार्थी , शेतकरी , महिला यांच्या उत्थानासाठी व्हायला हवा. गुजरातमध्ये व्हर्चुअल शिक्षण दिले जाते. नंदुरबारची समिती त्या ठिकाणी पाठवा. गुजरातच्या धर्तीवर डिजिटल क्लासरूम प्रत्येक ग्रामीण भागात जोडल्यास शिक्षणाच्या गुणवत्तेत फरक पडेल. यासाठी निधीची चिंता करू नका. केंद्रीय आरोग्य मंत्री माननीय मनसुख मांडविया यांनी मत व्यक्त केले.
यावेळी डाॅ.हिनाताई गावित खासदार, विजयकुमार गावित आमदार, जयकुमार रावल आमदार, जिल्हाधिकारी मनीषा खत्री मॅडम, रघुनाथजी गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, एस. एन पाटील विस्तार अधिकारी आष्टे बिटआदी मान्यवरांच्या उपस्थितीत अंकितकुमार मिश्रा उपशिक्षक जि.प.शाळा नागसर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून व्हर्चुअल क्लासरूम बाबत प्रेजेंटेशन केले व आपले शिक्षक इन्ट्रेेकटिव्ह पॅनलचा वापर प्रभावीपणे कशाप्रकारे करतात याचा डेमो दिला. कार्यक्रमाबाबत मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.सदर कार्यक्रम न.पा. शाळा क्र.१ नंदुरबार येथील डिजिटल क्लासरूम मध्ये पार पडला.
( Digital education should be given importance. Union Health Minister Mansukh Mandvia's two-day visit to Nandurbar. )



0 Comments
जय आदिवासी
जय जोहार