बागलाण तालुक्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडुंना आर्थिक मदत करण्याची मागणी.




सटाना प्रतिनिधी:- शिंदखेडा येथे 11 एप्रिल रोजी आदिवासी क्रांतिकारक विर खाज्या नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रातील पहिले राज्यस्तरीय भील महासंमेलन भरविण्यात आले होते. यावेळी बागलाण (सटाना) तालुक्यातील आदिवासी भील समाज सेवा व बहुद्देशीय संस्थेमार्फत मंत्री साहेबांना निवेदन देण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की बागलाण तालुक्यात आदिवासी समाजातील पाच आंतरराष्ट्रीय खेळाडु असुनही आजपर्यंत ते दुर्लक्षित आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शासनामार्फत आर्थिक मदत करून या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा. यावेळेस मंत्री साहेबांकडून लवकरच मदतीचे आश्वासन देण्यात आले. 


सदर कार्यक्रम भील समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष मा.दिपकदादा अहिरे व त्यांचे सर्व सहकार्यांनी आयोजित केला होता. तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी क्रिडा मंत्री मा.पद्माकरदादा वळवी, नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा मा.सिमाताई वळवी, मा.सुहास नाईक, आदिवासी एकता परिषदेचे मा.डोंगरभाऊ बागुल, रामलालदादा पवार, संजय पवार सर, कवी सुनील गायकवाड आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील भील समाजाचे पदाधिकाऱ्यांसह समाजबांधव उपस्थित होते.

  
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.प्रविण पवार सर सोमपूर, उपाध्यक्ष मा.कैलास मोरे सर, राजु वाघ, गणेश पगारे, दत्तात्रय सोनवणे, किरण पवार, संदिप पवार, सचिन सोनवणे, कृष्णा पवार, संदिप सोनवणे, काळु सोनवणे, सतिश पवार, राकेश सोनवणे, बादल सोनवणे, काकाजी पवार आदी समाजबांधव उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments

झाले