गोंदिया जिल्ह्यातील सर्व जमातींना एका झाडाखाली आणु -बिरसा क्रांती दल

आदिवासी युवा (Adiwasiyuva.com)



✍मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल  मो-9307691872

गोंदिया:- बिरसा क्रांती दल ( Birsa Kranti Dal ) गोंदिया तालुका शाखा अर्जुनी मोरगाव यांच्या वतीने दि.२३/०४/२०२२ जि.प.प्राथमिक शाळा बोंडगाव/सुर येथे बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. भिवाजी मलगाम, प्रमुख पाहुणे म्हणून श्री. फागुजी परदे संघटक बिरसा क्रांती दल गोंदिया, मालतीताई किन्नाके जिल्हाध्यक्ष बिरसा क्रांती दल गोंदिया, तुलशिदास कोडापे जिल्हाध्यक्ष बिरसा क्रांती दल गोंदिया, हेमलताताई आहाके उपाध्यक्ष बिरसा क्रांति दल, नाशिकाताई कोडापे सरपंच मुंगली, जयपाल तुलावी तालुकाध्यक्ष अर्जुनी-मोर, बकारामजी कोडापे, नरेंद्रजी कोडापे ग्रा.प.सदस्य गोठणगाव, चुन्निलाल कोडापे उपाध्यक्ष बिरसा क्रांति दल अर्जुनी मोर, तथा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



या कार्यक्रमाचे संचालन‌ रमेश मलगाम यांनी केले तर आभार प्रदर्शन नाशिकाताई कोडापे सरपंच मुंंगली यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुका कार्यकारणी अर्जुनी-मोर येथे नाशिकाताई कोडापे यांची महिला फोरम तालुकाध्यक्ष पदी, साधनाताई कोडापे यांची तालुका उपाध्यक्ष, अक्षय तलांजे यांची तालुकाध्यक्ष युवा, एकनाथ कोरेटी यांची तालुका प्रसिद्धि प्रमुख, रमेश मलगाम तालुका महासचिव, तालुका महिला संघटक पदी शकुंतला वट्टी यांची निवड करण्यात आली.



सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मालतीताई कन्नाके यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देऊन गौरविण्यात व भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले. बोंडगाव येथील युवावर्ग व मातृशक्तीने या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले.



Post a Comment

0 Comments

झाले